viral photo saka;
देश

.. म्हणून लिंबू ऐवजी मिरचीसोबत बांधलं लसून; IPS अधिकाऱ्याने शेअर केलेला फोटो व्हायरल

लिंबाच्या किंमतीवरुन सोशल मीडियावर अनेक विनोदही शेअर केले जात आहेत

सकाळ डिजिटल टीम

देशात वाढत्या महागाईचा फटका सर्वांनाच बसत आहे.दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्वच महाग झालंय.सध्या उन्हाळ्यात अत्यंत आवश्यक असलेले लिंबाचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत. या महागाईमुळे सर्वसामान्यांना लिंबू खरेदी करणे कठीण झाले आहे. लिंबाच्या किंमतीवरुन सोशल मीडियावर अनेक विनोदही शेअर केले जात आहेत. लोक मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत. (people started hanging garlic with chilli to avoid evil ips photo goes viral)

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर एक मजेशीर फोटो शेअर केलाय.या फोटोत मिरचीसोबत लिंबूऐवजी लसूण लटकलेले दिसत आहे

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केलेल्या फोटोत मिरचीसोबत लिंबूऐवजी लसूण लटकलेले दिसत आहे. हे चित्र पाहून तुमच्याही मनात एक गोष्ट नक्कीच आली असेल की मिरचीसोबत लिंबू असे टांगले जाते, मग इथे लसूण का दिसतो? याचे कारण म्हणजे लिंबाचे वाढता भाव. वाईट नजरेपासून वाचण्याकरीता एवढा महागडा लिंबू विकत घेणे न परवडणारे आहे.

आयपीएस अधिकारी यांनी शेअर केलेल्या फोटोसोबत एक मजेशीर कॅप्शनही लिहिले. त्यांनी लिहिले की, वाढत्या महागाईला पाहता लिंबू नसताना लसूणला प्रतिनियुक्तीवर टाकण्यात आले. लसूणने आज पदभार स्वीकारलाय. या पोस्टवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT