Ration Card sakal
देश

Ration Card: 10 लाख लोकांचं रेशन कार्ड होणार रद्द, तुमचाही यात समावेश आहे का?

सरकारने आता या लोकांचं रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.

सकाळ डिजिटल टीम

मोफत सरकारी रेशनचा भारतातील लाखो लोक लाभ घेतात. मात्र याच सुविधेचा गैरफायदा घेणारे आणि चुकीच्या मार्गानं रेशन मिळवणाऱ्यांना आता सरकार धारेवर धरणार आहे. कारण सरकारने आता त्या लोकांचं रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. (people will not get free food as government will cancel 10 lakhs ration cards read story)

सरकारने देशभरातून 10 लाख फेक रेशन कार्ड समोर आणले आहे आणि आता हे फेक रेशन कार्ड लवकरच रद्द करून त्यांच्या रेशनवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकराच्या या निर्णयाने आता फसवणूक करणाऱ्यांना चांगलीच अद्ददल घडणार आहे. एवढंच काय तर जे फेक रेशन कार्डधारक समोर आले त्यांच्याकडून आता सरकार रेशनची वसूलीही करणार आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून (Government) सर्व रेशनकार्डधारकांना दर महिन्याला मोफत धान्य दिले जात आहे. सध्या देशात सुमारे 80 कोटी लोक याचा लाभ घेत आहेत. 

आता सरकारने 'वन नेशन, वन रेशन कार्ड’ (One Nation, One Ration Card) लागू केले आहे. या बदलानंतर तुम्ही देशात कुठेही कोणत्याही राज्याच्या रेशनचा लाभ घेऊ शकता.मात्र आता देशात ज्या लोकांचे रेशन कार्ड बनावट आहेत त्यांचे रेशन कार्ड सरकार रद्द करणार आहे.

अपात्र रेशनकार्डधारकांची यादी सुरवातीला डीलरकडे पाठवली जाईल. यानंतर डीलर या लोकांचे राशन बंद करतील. तसेच डीलर्स नावे अधोरेखित करतील आणि अशा रेशनधारकांचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवला जाईल. त्यानंतर त्यांचे रेशनकार्ड रद्द केली जातील.'

रेशन कार्डचे राशनसोबतच अनेक फायदे आहे. तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल किंवा बँकेत खाते उघडायचे असेल, तर तुम्हाला ओळख (Identity) आणि रहिवासी पुरावा (Residential Proof) म्हणून रेशन कार्ड (Ration Card) वापरता येते. वाहन चालविण्याचा परवाना (Driving License) बनवण्यासाठीदेखील हा वैध पुरावा (Valid Proof) मानला जातो. एवढंच काय तर रेशन कार्ड असल्यास एलपीजी कनेक्शन मिळणे सोपे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT