petrol sakal
देश

पेट्रोल केवळ ३१ तर डिझेल ९६ पैशांनी स्वस्त

१७ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान एकदाही पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या वर्षांपासून सुसाट असलेली इंधन दरवाढ आता थांबली असून भाव कमी होण्यास सुरवात झाली आहे. मात्र ज्या तुलनेत दर वाढले ते त्याच पद्धतीने कमी होताना दिसत नाहीत. ऑगस्टमध्ये पेट्रोल (Petrol) केवळ ३१ तर डिझेल (Diesel) ९६ पैशांनी स्वस्त झाले आहे.

१७ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान एकदाही पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले नाहीत. विशेष म्हणजे त्या काळात चार वेळा दर काही पैशांनी कमी झाले होते. मात्र त्यानंतर दर स्थिर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती परवडत नसल्याने आता अनेकांनी सीएनजी किंवा इलेक्ट्रॉनिक वाहने घेण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र सीएनजीचे दर ९० पैशांनी वाढले आहेत. दोन ऑगस्ट रोजी ही दरवाढ झाली आहे.

२४ पासून दर स्थिर

गेले काही महिने इंधनाच्या दरात दररोज बदल होत होते. मात्र आता त्यात देखील स्थिरता आली आहे. २४ ऑगस्टनंतर ३१ ऑगस्टपर्यंत दरांत बदल झालेले नाहीत. गेल्या काही दिवसांचा विचार करता दर स्थिर राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

दर कमी होण्याची प्रमुख तीन कारणे :

- डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे

- सौदी अरबने उत्पादन वाढविल्याने पुरेसे इंधन उपलब्ध होत आहे

- कच्चा तेलाच्या किमती प्रती बॅरल ७५ वरून ७१ डॉलर झाल्या आहेत

इंधनाच्या किमती कमी होत आहेत, ही खूप चांगली बाब आहे. सरकारने कर कमी केले तर वाहनचालकांच्या खिश्‍यावरील बोजा आणखी कमी होर्इल. रुपयाचे मजबुतीकरण, पुरेसा पुरवठा आणि कच्चा तेलाच्या किमती कमी होत गेल्या तर दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने आता दुष्काळी बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

- अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

ऑगस्टमध्ये झालेले दरातील बदल :

ता. २

पेट्रोल - १०७.४५

पॉवर पेट्रोल - १११.१३

डिझेल - ९५.६०

सीएनजी - ५७.५०

ता. २०

पेट्रोल -१०७.४५

पॉवर पेट्रोल - १११.१३

डिझेल - ९४.९९

सीएनजी - ५७.५०

ता. २४

पेट्रोल -१०७.१४

पॉवर पेट्रोल - ११०.८२

डिझेल - ९४.६४

सीएनजी - ५७.५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil and Devendra Fadnavis : शरद पवारांचे खासदार दिल्लीत नरेंद्र मोदींच्या भेटीला जाण्यापूर्वी जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास; राजकीय चर्चांना उधाण

Thane News: ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मालमत्ता कर तसेच टीएमटीचे तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

Marathi News Live Updates : कॉकरोच म्हणणाऱ्यांकडून डिग्री घेणं...; दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीशांना बोलावल्याने विद्यार्थी संतापले

Kishori Pednekar: ... तर अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा फेकू, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा इशारा

SCROLL FOR NEXT