photographer found dead man was alive now admitted in the hospital at kerala 
देश

मृतदेहाचा फोटो काढायला गेले अन्...

वृत्तसंस्था

अर्नाकुलम (केरळ): पोलिसांनी एका मृतदेहाचा फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरला पाठवले. फोटोग्राफर घटनास्थळी दाखल झाल्यानंतर फोटो काढत असतानाच संबंधित व्यक्तीच्या तोंडातून आवाज आला. यामुळे गोंधळलेल्या फोटोग्राफरने पोलिसांना माहिती दिली. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर जीवंत असल्याचे आढळून आले.

अर्नाकुलम जिल्ह्यातील कलामासरी परिसरात ही घटना घडली. ऍदाथाला पोलिसांनी फोटोग्राफर टॉमी थॉमस यांना मृत व्यक्तीचे फोटो काढण्यासाठी घेऊन गेले होते. शिवदासन असे मृत मानल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवदासन मृत असल्याचे समजल्यानंतर पोलिस त्यांच्यावर पुढील कारवाईही करणार होते. थॉमस जेव्हा मृतदेहाचा फोटो काढण्यासाठी जवळ गेले, तेव्हा त्यांना आवाज येऊ लागला. यानंतर थॉमस यांनी पोलिसांना याबाबत माहित दिली. शिवदासन जिवंत असल्याचे समजल्यानंतर त्यांना तत्काळ त्रिशूरच्या ज्युबिली मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान  उच्च रक्तदाबाचा झटका आल्यामुळे शिवदासन खाली पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, शिवदासन पलक्कडमधील कलामासेरीजवळ भाड्याच्या घरात एकटेच राहतात. शिवदासन यांच्या घरातून विचित्र येऊ लागल्यामुळे शेजारील रहिवास्यांनी घरामध्ये डोकावले असता, ते रक्ताबंबाळ अवस्थेत निपचीत पडलेले दिसते. शेजारील नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी पोलिस आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT