Physics Wallah Teacher Slapped & Assaulted By A Student In Live Class video viral  Sakal
देश

Physics Wallah: धक्कादायक! लाइव्ह क्लासमध्येच शिक्षकाला विद्यार्थ्याने केली मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Physics Wallah: शिक्षकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राहुल शेळके

Physics Wallah: शिक्षकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे फिजिक्सवाला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मारहाण करणारा दुसरा कोणी नसून शिक्षकाच्याच वर्गातील विद्यार्थी आहे.

हा व्हिडीओ लाईव्ह चालू होता, अनेक विद्यार्थ्यांनी घरी बसून हा व्हिडीओ पाहिला आहे. लाइव्ह स्ट्रीम दरम्यान शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक शांततेने शिकवताना दिसत आहेत. तेव्हा एका विद्यार्थ्याने त्यांना अचानक मारहाण केली आणि त्यांना चप्पलने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला आहे. अनेकांनी कमेंट करून प्रकरण काय आहे, अशी विचारणा केली आहे.

देशातील सर्वात मोठा एडटेक युनिकॉर्न प्लॅटफॉर्म फिजिक्सवाला या अगोदरही चर्चेत आला होता. फिजिक्सच्या तीन शिक्षकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही शिक्षक फिजिक्सवालातून वेगळे झाले होते.

त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये फिजिक्सवाला सोडलेल्या तीन शिक्षकांनी कंपनीवर गंभीर आरोप केले होते. व्हिडिओमध्ये तिन्ही शिक्षकांनी कंपनीचे संस्थापक अलख पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फिजिक्सवालाच्या शिक्षकांवर मुलांकडून पैसे उकळल्याचा आरोप होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee : बंगाली बोलल्यामुळे मजुराची हत्या; ममता बॅनर्जी यांचा पुण्यातील घटनेबद्दल दावा

Professor Recruitment : प्राध्यापक भरतीसाठी ‘६०+२०+२०’चा नियम

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या विरुद्ध अटक वॅारंट जारी

प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली Good News!सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...'आमच्या आयुष्यातील सगळ्यात...'

Rajgurunagar Crime : इन्स्टाग्रामवर ओळख; प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT