Pilot Training Center esakal
देश

भाजप खासदाराच्या निधनानंतर बेळगावच्या हातून 'ही' संधी हुकली

विनायक जाधव

वैमानिकांची मागणी घटल्यामुळं बेळगावातील हे केंद्र बंद झालं होतं; पण..

बेळगाव : वैमानिक प्रशिक्षण केंद्र (Pilot Training Center) स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं यापूर्वी बेळगाव आणि गुलबर्गा विमानतळांची निवड केली होती. पण, आता बेळगावात होऊ घातलेले वैमानिक प्रशिक्षण केंद्र हुबळीला (Pilot Training Center Hubli) मंजूर झाले आहे. बेळगाव विमानतळावर प्रशिक्षण केंद्रासाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असताना देखील बेळगावच्या (Belgaum) हातून ही संधी हुकली आहे.

हुबळी विमानतळावरील वैमानिक प्रशिक्षण केंद्राला केंद्र सरकारनं (Central Government) मंजुरी दिलीय. देशात वैमानिकांची संख्या कमी आहे, त्यामुळे नवे वैमानिक तयार करण्यासाठी देशभरातील निवडक सहा विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले जात आहे. यात प्रारंभी बेळगाव आणि गुलबर्गा विमानतळ यांचा समावेश करण्यात आला होता. पण, आता बेळगावऐवजी हुबळी विमानतळाची निवड झालीय. बेळगावात हे केंद्र सुरू केले जावे, ही जुनी मागणी आहे. खासदार सुरेश अंगडी (Suresh Angadi) रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता.

पण, त्यांच्या निधनानंतर आता ही संधी बेळगावला हुकली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हुबळी येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी विमानोड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. देशभरात अशाप्रकारे सहा वैमानिक प्रशिक्षण केंद्र सरकारकडून स्थापली जात आहेत. बेळगावातील विमानतळ हे ब्रिटिशकालीन असून नुकतेच या विमानतळाचे विस्तारीकरण देखील झाले आहे. यापूर्वी देखील बेळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र होते. पण, वैमानिकांची मागणी घटल्यामुळे बेळगावातील हे केंद्र बंद झाले होते. पण आता केंद्र सरकारच्या उडाण योजनेमुळे नव्या कंपन्याची देशाच्या विमान सेवेत भर पडली असून विमानांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशिक्षित वैमानिकांची गरज भासत आहे. यासाठी बेळगावसह देशभरातील सहा ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार होते. पण, या यादीतून आता बेळगावला वगळण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित आर्याने १७ मुलांना जमवलं कसं? गोळी झाडली की नाही? एन्काउंटरबाबत मोठे अपडेट समोर

Belagav Black Day : काळा दिनानिमित्त बेळगावात आज निषेध फेरी; कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदीच्या नोटिसा

Latest Marathi News Live Update : मराठी भाषकांवर अन्याय, बेळगाव सीमाभागात आज काळा दिन पाळला जाणार

MNS and MVA Morcha in Mumbai : निवडणूक आयोगाविरोधात आज 'मनसे'सह ‘मविआ’चा मुंबईत निघणार ‘सत्याचा मोर्चा’

‘HSRP’ नंबरप्लेट नंबर नसल्यास होणार ‘इतका’ दंड! पहिल्यांदा १००० रुपये, त्यानंतर प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड; सोलापूर जिल्ह्यात ७,२६,९१८ वाहनांना जुनीच नंबरप्लेट

SCROLL FOR NEXT