PM Narendra Modi Corona Review Meeting esakal
देश

देशभरात नवे निर्बंध? पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्वाची बैठक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णांची (India Corona Cases) नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे चिंता वाढली असून देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज सायंकाळी साडेचार वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत देशात नवे निर्बंध लावण्यातबाबत निर्णय होणार आहे का? याकडे लक्ष लागलं आहे.

गेल्या २४ तासांत दिवसभरात देशात १ लाख ५९ हजार ४२४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४० हजार ८६३ जण कोरोनामुक्त झाले. तसेच कोरोनामुळे ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हीटी रेट १०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मोदींनी महत्वाची बैठक बोलावली असून यामध्ये राज्यांना निर्बंधांबाबत नवे निर्देश देण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाबाबत नवे निर्बंध जारी केले असून १० जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्रात सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, तर रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक सभांवर देखील बंद घातली असून लग्नावर देखील काही निर्बंध आहेत. आता मोदींच्या बैठकीनंतर राज्याला आणखी काय सूचना येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

Naigaon Crime : बापाचा मृतदेह दारातच सोडून नराधम मुलगा पळाला; मात्र, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT