PM Modi inaugurated railway line between Thane and Diva Junction टिम ई सकाळ
देश

स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मुंबईचे मोठे योगदान; मोदींनी केले कौतुक

नरेंद्र मोदी यांनी ठाणे ते दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे (पाचवी आणि सहावी) लाईन्सचे आज उद्घाटन केले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईत २१व्या शतकातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आमचे विशेष लक्ष असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नरेंद्र मोदी यांनी ठाणे ते दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे (पाचवी आणि सहावी) लाईन्सचे आज उद्घाटन केले. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय लोकललादेखील हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (B S Koshyari) सुध्दा ऑनलाईन उपस्थित होते. (PM Modi Inaugurate Thane-Diva Lines)

स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मुंबईचे मोठे योगदान आहे. आता आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी मुंबईची क्षमता अनेक पटींनी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या नव्या सुविधांचा लाभ मुंबई आणि आसपासच्या शहरांना होणार असल्याचे यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले. या प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्राचे आभार मानले. मोदीजींचे नेहमी सहकार्य महाराष्ट्राला लाभले आहे आणि कायम लाभेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ठाणे आणि दिवा (Mumbai Local) यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून, यात 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, 3 मोठे पूल, 21 छोटे पूल यांचा समावेश आहे. या मार्गांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीतील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होणार असून, या मार्गांमुळे शहरात 36 नवीन उपनगरीय गाड्या सुरू करता येणार आहेत

कल्याण (Kalyan Station) हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन असून, देशाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक कल्याण येथे एकत्र येते आणि येथून पुढे या ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) रवाना होतात. कल्याण आणि सीएसटीएम दरम्यान चार ट्रॅकपैकी दोन ट्रॅक हे धीम्या लोकलसाठी तर दोन ट्रॅक जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि माल गाड्यांसाठी वापरले जातात. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्याची वाहतूक स्वतंत्रपणे करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karachi Attack: कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा निशाणा भारतावर; कोणताही पुरावा नसताना ठरवले जबाबदार

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या खिलाडूवृत्तीवर संशय? कर्णधार श्रेयस अय्यर संतापला, दुसऱ्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं?

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

Latest Marathi News Update : जनतेने राम मंदिराच्या नावावर मतदान केले आणि त्यांच्याच लोकांनी घोटाळा केला - खासदार महुआ माजी

Career Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांचे नशीब असते बलवत्तर! कोणतीही परीक्षा एका झटक्यात होतात पास, समाजात मिळवतात मोठं स्थान

SCROLL FOR NEXT