PM Narendra Modi on Chittranjan Das
PM Narendra Modi on Chittranjan Das eSakal
देश

'देशसेवेसाठी मला पुन्हा पुन्हा भारतात जन्म घ्यायचाय असं देशबंधू म्हणायचे'

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : मला या देशासाठी जगता यावं, मला देशासाठी काम करता यावं यासाठी मला पुन्हा पुन्हा या देशात जन्म घ्यायचा आहे, असं देशबंधू चित्तरंजन दास म्हणायचे, असं पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या (Chittaranjan National Cancer Institute Kolkata) दुसऱ्या कॅम्पसचे उद्घाटन केले. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) देखील उपस्थित होत्या. यावेळी मोदी बोलत होते.

पंतप्रधान मोदी दोनच दिवसांपूर्वी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेच्या संबंधित गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलं होतं. मी भटींडा विमानतळापर्यंत जीवंत पोहोचू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, असं मोदींनी म्हटल्याची माहिती होती. त्यानंतर आज मोदींनी पश्चिम बंगालमधील कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित दर्शवली. यावेळी त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास आणि महर्षी सुश्रूत यांची स्तुती केली. ''देशबंधू चित्तरंजन दास आणि महर्षी सुश्रूत यांच्यापासून सर्वांना खूप प्रेरणा मिळाली आहे. त्यांची प्रतिमा खूप मोठी आहे. देशबंधू नेहमी म्हणायचे, मला या देशासाठी जगता यावं, मला देशासाठी काम करता यावं यासाठी मला पुन्हा पुन्हा या देशात जन्म घ्यायचा आहे'', असं मोदी म्हणाले.

देशात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काम झाले आहे. आरोग्य विभागातील आव्हानांना आम्ही स्वीकारले असून ते कमी करण्यासाठी काम केले जात आहे. आमच्या अनेक योजनांमुळे लोकांना फायदा होत आहे. हर घर जल अभियान योजनेतून नागरिकांना फायदा झाला आहे. गरीब आणि सर्वसामान्य आरोग्य सुविधांपासून वंचित होते. त्यावेळी आरोग्यांच्या सुविधा महाग होत्या. त्यावेळी कर्ज, घर-जमीन विकून त्यांना उपचार करावे लागत होते. पण, आता तसं नाही. त्यांना सर्व सुविधा मिळतात. ८ हजारांपेक्षा अधिक जनऔषधी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यामधून कमी पैशात औषध मिळतेय. कॅन्सरच्या स्वस्त दरात औषध उपलब्ध आहे. सरकारच्या संवेदनशीलता गरीबांना स्वस्त दरात औषधोपचार देत आहे, असंही मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT