PM Narendra Modi at Lok Sabha
PM Narendra Modi at Lok Sabha e sakal
देश

राजकीय नेत्यांकडून कोरोना संकटाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न - PM मोदी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना काळातील संकटाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न अनेक राजकीय नेत्यानं केला. पण, देशातील जनतेनं कोरोनाविरोधात (Corona) लढा दिला आहे. कोरोनाच्या संकटाला आपण ज्या प्रकारे तोंड दिलं ते देशाच्या जनतेचं श्रेय आहे, असं पंतप्रधान मोदी (PM Modi) संसदेत बोलताना म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर (PM Modi Parliament Speech) उत्तर देताना ते बोलत होते.

गेल्या १०० वर्षात लोकांनी इतकं मोठं संकट पाहिलं नाही. संकाटाची तीव्रता मोठी होती. सर्व मानवजातीसाठी मोठं संकट होतं. आता देखील हे संकट आहे. पूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढा देत आहे. भारताने कोरोनाला हरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची स्तुती जगात होत आहे. हे कोणत्या राजकीय पक्षाने केलं नाही. हे जनतेचं श्रेय आहे. पण, काही राजकीय नेते कोरोना संकटाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात, असं पंतप्रधान मोदी संसदेत बोलताना म्हणाले.

कोरोना काळात प्रत्येक तरुणानं चांगलं काम केलं. क्रीडा क्षेत्रात सर्व तरुण खेळाडूंनी देशाचा सन्मान वाढवला आहे. स्टार्टअप क्षेत्रात देखील खूप भारताला टॉप ३ मध्ये जागा मिळाली आहे. हे फक्त तरुणांमुळे शक्य झालं आहे. देशात अनेक गरीब कुटुंबांना घर मिळालं. ५ कोटी कुटुंबांना नळ योजनेद्वारे पाणी दिलं. ऑटोमोबाईल क्षेत्रात भारताची प्रगती झाली आहे. एमएसएमई मंत्रालयाद्वारा अनेक कामे झाले आहेत, असंही मोदी म्हणाले.

२०० कोटीपर्यंतचे टेंडर देशातच निघतील -

केंद्र सरकार उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूत डिफेन कॉरीडोअर बनवत आहे. त्यासाठी दुसऱ्या देशासोबत काही करार देखील केले आहेत. २०० कोटीपर्यंतचे टेंडर हे जागतिक स्तरावर होणार नाही. देशातच हे टेंडर काढले जातील. त्यामुळे देशातील लोकांना त्याचा फायदा होईल, असंही मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT