PM Narendra Modi Team eSakal
देश

"PM मोदींचा घरातील फोटो काढा, अन्यथा..."; मुस्लीम व्यक्तीला धमकी

वारंवार धमक्या मिळाल्यानंतर या व्यक्तिनं पोलिसांकडे तक्रार केली होती.

सुधीर काकडे

मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आगे. घरात मोदींचा (PM Narendra Modi) फोटो लावल्याने एका मुस्लीम व्यक्तीला धमकावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने पोलिसांच्या (Police) जनसुनावणी दरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता. जनसुनावणी मंचाशी संपर्क साधून या व्यक्तीनं आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घरातील फोटो न काढल्यास हाकलून देण्याची धमकी दिली आहे.

इंदौरच्या पीर गलीमध्ये राहत असलेल्या युसूफने मंगळवारी पोलिस आयुक्त कार्यालयात जनसुनावणी सत्रादरम्यान ही धक्कादायक तक्रार केली. पंतप्रधान मोदींच्या विचारसरणीने प्रेरित होऊन युसूफने त्यांच्या भाड्याच्या घरात पंतप्रधानांचा फोटो लावला होता. त्यानंतर जमीनदार याकुब मन्सूरी आणि सुलतान मन्सूरी यांनी फोटो काढण्याचा इशारा दिला.

युसूफ यांचा आरोप आहे की, त्यांच्या घरमालकांनी पंतप्रधान मोदींचा फोटो काढण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र आपण तसे करण्यास नकार दिल्याने त्यांनी आपल्याला घरातून हाकलून देण्याची धमकी दिली. यानंतर भाडेकरूने जनसुनावणी फोरममध्ये हे प्रकरण मांडण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT