देश

रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घेतली आढावा बैठक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज रविवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. PM मोदींची याआधीची बैठक 24 डिसेंबर रोजी झाली होती. मात्र तेव्हापासून, देशातील कोरोना परिस्थिती बदलली आहे आणि दैनंदिन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येतील ही वाढ दिवसेंदिवस होतच आहे. अनेक शहरांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव वाढला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमधील (Uttar Pradesh, Punjab, Uttarakhand, Goa, Manipur) निवडणूक वेळापत्रकाची घोषणा या पार्श्वभूमीवर ही चिंता आणखी वाढली आहे. सध्या 15 ते 18 वयोगटातील किशोरांचंही कोरोना लसीकरण केलं जात आहे, तर 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स ज्येष्ठ नागरिकांसाठी खबरदारीचे डोस उपलब्ध असणार आहे.

भारतातील कोरोनाची संख्या गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढत आहे. रविवारी भारतात 1.59 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ऍक्टीव्ह केसलोड सुमारे 6 लाखांवर पोहोचला आहे. अनेक राज्यांनी ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शनिवार व रविवारी कर्फ्यू, रात्रीचा कर्फ्यू आणि इतर निर्बंध लादले आहेत.

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर येथे १० फेब्रुवारीपासून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने या पाच राज्यांच्या निवडणुका पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी जाहीर केला आहे. या निवडणुका सर्व कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून घेतल्या जातील, अशी घोषणा करण्यात आली आहे. ओमिक्रॉनची परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच या मतदानाच्‍या राज्यांमध्‍ये 15 जानेवारीपर्यंत प्रत्यक्षातील प्रचाररॅलींवर बंदी घातली आहे. आयोगाच्या पुनरावलोकनानंतर ही बंदी उठू शकते, परंतु EC चा प्रचार कर्फ्यू रात्री 8 नंतर कायम राहणार आहे.

संशोधकांच्या मते, भारतात महामारीचा तिसरा टप्पा सुरु आहे. हा तिसरा टप्पा पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा वेगळा आहे कारण सध्या नागरिकांचे लसीकरणाचे व्यापक प्रमाणावर झालेले असून निर्बंधही कमी आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती झपाट्याने बदलत असून या महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट शिखरावर पोहोचू शकतो, असे तज्ञांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT