Narendra Modi 
देश

Narendra Modi : गुजरातेत ५ वर्षात दीड लाख नोकऱ्या, PM मोदींचा मोठा दावा...

सकाळ डिजिटल टीम

Narendra Modi : देशात विरोधक बेरोजगारी आणि महागाईवर भांडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी गुजरातच्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले.

आजच्या कार्यक्रमामुळे हजारो कुटुंबांसाठी होळी या महत्त्वाच्या सणाचा आनंद अनेक पटींनी वाढला आहे. गुजरातमध्ये अल्पावधीतच दुसऱ्यांदा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यासाठी मी मुख्यमंत्री भूपेंद्रभाई आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले गुजरातमध्ये गेल्या पाच वर्षात दीड लाख नोकऱ्या देण्यात आल्या. याव्यतिरिक्त  गुजरातमधील १८ लाखांहून अधिक तरुणांना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मोदी म्हणाले. 

मोदी म्हणाले, आम्ही गुजरातमधील दाहोद येथे २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने रेल्वे इंजिन कारखाना सुरू केला आहे. गुजरातही सेमीकंडक्टरचे केंद्र बनणार असून या प्रकल्पांमुळे हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

स्टार्टअप्सचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की आमच्या देशात ९० हजारहून अधिक स्टार्टअप्स आहेत. मला आनंद आहे की केंद्र सरकारचे सर्व विभाग आणि एनडीएची राज्य सरकारे जास्तीत जास्त नोकऱ्या देण्यासाठी सतत कार्यरत आहेत. सातत्याने रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT