PM Modi on Indian Student Stranded Ukraine
PM Modi on Indian Student Stranded Ukraine E sakal
देश

भारतीयांना परत आणण्यात कुठलीही कसर सोडणार नाही, PM मोदींचं प्रचारसभेत वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सात दिवसांपासून युद्ध (Ukraine Russia War) सुरू आहे. या युद्धाच्या झळा युक्रेनसोबतच भारतीयांना देखील बसल्या आहेत. युक्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. त्यानंतर अनेकांनी मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला आहे. पण, आम्ही युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणू, असं पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या (UP Election 2022) प्रचार सभेत ते बोलत होते.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत मायदेशी परत आणले जात आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत हजारो भारतीयांना युक्रेनमधून भारतात परत आणले. या मोहिमद्वारे समन्वय साधण्यासाठी आम्ही चार केंद्रीय मंत्र्यांना विदेशात पाठवलं आहे. भारतीयांना युक्रेनमधून सुखरुप परत आणण्यात कुठलीही कसर सोडणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी अचानक युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रशियन सैनिक युक्रेनमध्ये घुसले. शहरांवर बॉम्ब हल्ले करण्यात आले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले. रशियानं युक्रेनवर हवाई हल्ला केल्यामुळे युक्रेनचे सर्व विमानतळ बंद करण्यात आलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मायदेशी परतण्याचे सर्व मार्ग बंद झालेत. खारकीव्ह शहरात रहिवासी इमारतींवर देखील हल्ला करण्यात आला. यामध्येच एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर विरोधकांनी आणि नागरिकांनी देखील मोदी सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांना आणण्यास उशिर का केला? असा सवाल सरकारला विचारला जात आहे.

युक्रेनमधून आतापर्यंत १२ हजार विद्यार्थ्यांना परत आणले. पण, अद्याप ८ हजार भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना आणण्यासाठी विमाने पाठवण्यात आली. पण, रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर असलेल्या खारकीव्ह शहरात सध्या चिंताजनक स्थिती आहे. तिथे काही विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना या शहरातून बाहेर पडण्याच्या सूचना भारतीय दूतावासानी दिल्या आहेत. पण, विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर पडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. त्याचे व्हिडिओ देखील विद्यार्थ्यांनी शेअर केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT