pm modi  
देश

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना चालू भाषणात मधेच थांबवलं

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा देशात वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना त्यांच्या भाषणावेळी मधेच थांबवलं. खट्टर यांना थांबवताना मोदी म्हणाले की, आकड्यांची चर्चा करण्यापेक्षा कोरोनाला रोखण्यासाठी रणनितीवर बोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आठ मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबत बोलताना सांगितलं की, हरियाणामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दररोजची वाढ ही सरासरी 2 हजार इतकी आहे. हे वाक्य बोलताच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मनोहरजी आकडे तर आमच्याकडे आधीच आले आहेत. तुम्ही कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी काय करता येईल याबाबत तुमचे म्हणणे सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या रणनितीबद्दल लिखीत स्वरुपात त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास मुख्यमंत्र्यांना सांगितलं. तसंच कोणी कोणतीही गोष्ट लागू करू शकत नाही. सर्वांना एकत्र मिळून काम करावं लागेल. 

मुख्यमंत्री खट्टर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, राज्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत होते. आम्हाला एक यादी तयार करण्यास सांगितलं होतं. ज्यामध्ये पहिल्यांदा कोणाला व्हॅक्सिन दिलं जाणार याची माहिती असेल. तसंच व्हॅक्सिन देताना पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर इतरांना दिले जातील. मात्र अद्याप याचे निकष ठरलेले नाहीत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की लस कधी येणार हे कोणी सांगू शकत नाही त्यामुळे आरोग्य नियमांच्या अंमलबजावणीत बिलकूल ढिलेपणा येता कामा नये. लस येण्याबाबत कोणी काही सांगू शकत नसले तरी, काही लोक यावरूनही राजकारण करत आहेत. त्यांना राजकारण करण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला.

पंतप्रधान म्हणाले की, देशात कोरोना चाचण्यांचे नेटवर्क वाढत आहे. आमच्याकडे लशीकरणाच्या प्राधान्यक्रमातील पुरेसा आकडा असेल तर, पुढील तयारी करणे सोपे जाईल. सुरुवातीला कोरोनाबाबत लोकांच्या मनात भीती होती. मात्र आता भीतीची जागा बेपर्वाईने घेतल्याचे दिसत आहे. हे अत्यंत अयोग्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT