pm modi with cm maharashtra 
देश

परीक्षा ते शेतीपर्यंतच्या मुद्यांवर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली ही मागणी

सकाळ वृत्तसेवा


नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी बुधवारी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या चर्चेवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही मागण्या केल्या आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं की, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारामध्ये सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. सध्या कोरोनावर कोणताही ठोस उपचार नाही. अशा परिस्थितीत केंद्राने राज्य सरकारला कोरोनावर इतर उपचारासाठी परवानगी द्यावी ज्यातून सकारात्मक प्रभाव दिसून येतो. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, ग्रामीण भागात व्हेंटिलेटर्सची गरज आहे. तसंच प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल कोर्सच्या परिक्षांसबंधीचा निर्णय केंद्रीय शिक्षण संस्थांनीच घ्यावा. पंतप्रधान गरीब कल्याण योजना जुलैपासून तीन महिन्यांसाठी पुढे वाढवण्यात यावी. त्यासोबत राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना तातडीनं कर्ज मिळण्याची सोय व्हावी अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुलभूत आरोग्य सुविधा वाढवण्याला आपलं प्राधान्य असायला हवं असे म्हटले आहे. देशातील मुलभूत सेवा सुविधा तेव्हाच वाढतील जेव्हा प्रत्येक कोरोनाग्रस्ताला चांगले उपचार मिळतील. यासाठी आपल्याला कोरोना 19 च्या चाचण्या वाढवायला हव्यात. संसर्ग झालेल्या रुग्णांची ओळख व्हायला हवी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT