modi modi
देश

कोरोनाचा मोदींनाही फटका, 'शक्तिशाली नेता' प्रतिमेला धक्का

नामदेव कुंभार

कोरोना महामारीमुळे (Covid-19) देशालाच नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोदींच्या कामकाजावर समाधानी असणारे दुसऱ्या लाटेत मात्र असमाधानी असल्याचं चित्र समोर आलं आहे. अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्टच्या अहवालानुसार, मोदी यांच्या लोकप्रियतेत घसरण झाली आहे. मॉर्निंग कन्सल्टने (Morning Consult's) जगभरातील काही नेत्यांच्या कोरोना काळातील लोकप्रियतेचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये मोदी यांची लोकप्रियता कमी झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना काळात मोदींची लोकप्रियता घसरुन 63 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे देशा-विदेशातील 'शक्तिशाली नेता' या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा आहे. (PM Modi’s rating falls as India reels from COVID-19 second wave)

मॉर्निंग कन्सल्टच्या (Morning Consult's )अहवालानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकार चांगलं काम करत असल्याचं 59 टक्के नागिरिकांनी सांगितलं. गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेत हेच मत तब्बल 89 टक्के लोकांचं होतं. वर्षभरात जवळपास 30 टक्के लोकांनी मोदींच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. 2014 नंतर 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भारतीयांना मोदी सरकारला पुन्हा एकदा संधी दिली. 2019 साली मोदींना जे बहुमत मिळाले तर ते गेल्या तीन दशकातील सर्वात मोठं बहुमत होतं. त्यामुळेच जगात एक शक्तिशाली नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. त्या तुलनेत आता मोदींच्या प्रतिमेत 22 टक्क्यांची घट झाली असून ती आता 63 टक्क्यांवर पोहोचली आहे.

कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) नियोजनात आलेल्या अपयशाचे (Unsuccess) पडसाद जागतिक पातळीवर उमटले असून यामुळे ब्रँड मोदीलाही (Brand Modi) तडा गेल्याने केंद्रीय पातळीवर डॅमेज कंट्रोलला वेग आला आहे. या अपयशातून सावरण्यासाठी नजीकच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) मोठे फेरबदल (Changes) होऊ शकतात किंवा त्याचा विस्तार देखील होऊ शकतो. यामुळे अनेक मंत्र्यांवर (Minister) कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा पहिलाच विस्तार असेल पण तो नेहमीसारखा नसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना केंद्राची जी नियोजनशून्यता समोर येत आहे, त्यामुळे जागतिक पातळीवर मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (Brands could be a big Changes Union Cabinet for Modi Politics)

याचा सरकारला फटका

‘आयुष्मान भारत’ योजना कुचकामी ठरली

ऑक्सिजन, जीवनावश्‍यक औषधांची टंचाई

देशात टंचाई असताना परदेशात लशींची निर्यात

टीकाकारांवरील कारवाईमुळे सरकार गोत्यात

भाजप नेत्यांच्या आततायीपणामुळे जनता नाराज

बंगालमधील प्रचार, कुंभमेळ्यामुळे वाढलेला संसर्ग

मृतांचे दडविले जाणारे आकडे, गंगेतील प्रेतांचा खच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT