pm narendra modi, madhya pradesh, farm laws 
देश

PM मोदींनी शेतकऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाले, 'तुमच्यासमोर नतमस्तक व्हायलाही तयार'

सकाळ ऑनलाईन टीम

PM Narendra Modi On Farm Laws : कृषी कायद्याच्या विरोधात 'दिल्ली चलो' हा नारा देत शेतकरी राजधानीच्या सीमाभागात एकवटत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या व्यासपीठावरुन शेतकऱ्यांना कृषी कायद्याविषयी भरवसा देत आहेत. शुक्रवारी मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील शेतकरी संम्मेलनाला संबोधित केले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवत मोदींनी कृषी कायद्यातील तरतूदी शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत, असे सांगितले. शेतकऱ्यांविषयी सरकार प्रामाणिकपणे काम करत असल्याचे सांगताना सरकारचा कारभार गंगा आणि नर्मदाच्या पाण्यासारखा पवित्र असल्याचा उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला. 

यावेळी मोदींनी विरोधकांवर पुन्हा एकदा तोफ डागली. विरोधी पक्षाला जे जमल नाही ते या सरकारने करुन दाखवल्याचे मोदी म्हणाले. शेतकऱ्यांना आपण दिलेले आश्वासन मोदींनी पूर्ण केले, याची विरोधकांना खंत आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही मोदींनी विरोधी पक्षावर केला. शेतकऱ्यांच्या मनात काही गोष्टींबाबत शंका राहिली असेल तर सरकार नतमस्तक होऊन आणि हात जोडून शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्यावर चर्चा करण्यास तयार आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

कृषी कायद्याचा विषय हा एका रात्रीत घेतलेला निर्णय नाही. मागील 20-22 वर्षांपासून याविषयी मंथन सुरु होते. प्रत्येक सरकारने या मुद्यावर व्यापक चर्चा केली. देशातील शेतकरी, वैज्ञानिक, अर्थशास्त्रज्ञ यांच्याकडून कृषी क्षेत्रातील बदलासाठी कायद्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारने ती सत्यात उतरवली, असेही मोंदीने सांगितले. निवडणुकीवेळी मतासाठी आश्वासन देणाऱ्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायला हवेत. त्यांनी कधीच शेतकऱ्यांना प्राधान्य दिले नाही, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral

Latest Marathi News Live Update: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज दिल्लीत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली

Baramati Politics:'बारामतीत राष्ट्रवादी व भाजपचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप'; उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाचे उमटले राजकीय पडसाद..

Google Search : रात्रीच्या वेळेस पुरुष गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने दुनिया हादरली

Raju Shetti: शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अटापिटा: राजू शेट्टींचा आरोप; टेंडरसाठी बड्या कंपन्यांकडून घेतला ॲडव्हान्स ?

SCROLL FOR NEXT