PM Narendra Modi And Amit Shah BJP Arunachal Pradesh Assembly Result 2024 Esakal
देश

मुख्यमंत्र्यांपासून माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीपर्यंत मतमोजणीपूर्वीच 'या' राज्यात BJP 10 जागांवर विजयी; वाचा, नेमका काय आहे प्रकार

Arunachal Pradesh Assembly Election 2024: मात्र, यापूर्वीच 10 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाही समावेश आहे.

आशुतोष मसगौंडे

देशात लोकसभा निवडणुकीसोबतच चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. 60 सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठी 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल आज 2 जून रोजी जाहीर होणार आहे.

मात्र, यापूर्वीच 10 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाही समावेश आहे.

भारत-चीन सीमेजवळील मुक्तो विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून पेमा खांडू यांची ही चौथी टर्म असेल. त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर २०१० च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते या जागेवरून बिनविरोध निवडून आले होते.

पेमा खांडू यांनी मुक्तो विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली होती. अन्य एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही. अशा स्थितीत खंडू यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उर्वरित नऊ जागांवरही भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

खांडू यांच्यासह नऊ जण बिनविरोध

मुख्य निवडणूक अधिकारी पवन कुमार सेन म्हणाले की, उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर खांडू आणि इतर नऊ जणांची बिनविरोध निवड झाली. ते म्हणाले की, सहा विधानसभा मतदारसंघात एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे, तर इतर चार ठिकाणी विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

बिनविरोध निवडून आलेल्या इतर उमेदवारांमध्ये तळी विधानसभा मतदारसंघातून जिक्के टाको, तालिहामधून न्यातो दुकोम, रोईंगमधून मुच्छू मिठी, ह्युलियांगमधून दसांगलू पुल, बोमडिलामधून डोंगरू सेओंगजू आणि सागलीमधून रतु टेची आणि झिरोमधून हापोलीमधून हागे अप्पा यांचा समावेश आहे. राज्यात १९ एप्रिलला एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. आता आज म्हणजेच 2 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

Pune Crime : जामखेडनंतर सासवडमध्येही खून; पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा केला पर्दाफाश!

SCROLL FOR NEXT