Prime Minister Narendra Modi birthday sakal
देश

PM Modi Birthday : मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव; वाचा कुणी कुणी दिल्या शुभेच्छा!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Happy Birthday PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विविध कार्यक्रमदेखील राबविले जात असून, अनेकांकडून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यामध्ये देशातील विविध नेत्यांचा समावेश आहे. बघूया कुणी कुणी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले गृहमंत्री अमित शहा

गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून लिहिले आहे की, "देशाचे सर्वात लाडके नेते आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. मोदीजींनी त्यांच्या प्रथम भारत या विचाराच्या आधारावर गरिबांच्या कल्याणासाठीचे संकल्पासारखी अशक्य कामे शक्य करून दाखवल्याचे शहांनी म्हटले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील ट्विट करून लिहिले आहे की, "भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी आपल्या नेतृत्वाने देशात प्रगती आणि सुशासनाला अभूतपूर्व बळ दिले आहे आणि भारताला वेगळ्या उंचीवर नेले आहे. देव त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य देवो. हीच इच्छा असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिल्या शुभेच्छा

भारताच्या राष्ट्रपतींनीदेखील मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणतात की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वाखाली अतुलनीय परिश्रम, समर्पण आणि सर्जनशीलतेने राबविण्यात येत असलेली राष्ट्रनिर्माण मोहीम अशीच सुरू राहो, अशी इच्छा आहे. देव तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो." अशा शुभेच्छा मूर्मू यांनी दिल्या आहेत.

काय म्हणाले राहुल गांधी

'भारत जोडो यात्रे'वर निघालेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा एवढ्याच शुभेच्छा राहुल गांधी यांनी दिल्या आहेत.

शशी थरूर

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट केले, "नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. देशातील अंधकार दूर करण्याची ताकद तुम्हाला मिळो असे थरूर यांनी म्हटले आहे.

शिवराज सिंह चौहान

पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, "पंतप्रधान श्री मोदीजींना मध्य प्रदेशातील 8.50 कोटी जनतेकडून अनंत शुभेच्छा! त्यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत असल्याचे चौहान यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Pune University Fake Degree: पुणे विद्यापीठातील बनावट बी.कॉम. पदवी प्रकरणात कर्मचारी रमेश मुखेकर ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत

Pune Voter List Revision: पुण्यात मतदार यादी पुनरीक्षणाचे फक्त ५५ टक्के काम; आठ दिवसांत उर्वरित ४५ टक्के पूर्ण करण्याचे प्रशासनास आव्हान

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

SCROLL FOR NEXT