Amit Shah Esakal
देश

Amit Shah: ...अन् चिंताग्रस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट फ्रान्सहून अमित शाह यांना केला फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. राजधानीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी दिल्लीत यमुना नदी धोक्याच्या पातळीपेक्षा 3 मीटरवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत अनेक भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.

अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले असून मेट्रो सेवेवरही परिणाम झाला आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या मंत्र्यांनी मदत आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे मदतीचे आवाहनही केले आहे. (Latest Marathi News)

अशातच नरेंद्र मोदींनी थेट फ्रान्समधून फोन करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. फोनवरुन झालेल्या या चर्चेदरम्यान, अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सध्या नेमकी काय स्थिती आहे याची माहिती दिली आहे. तसंच यमुना नदीचं पाणी पुढील 24 तासात ओसरण्यास सुरुवात होईल असंही सांगितलं आहे.

त्याचबरोबर अमित शाह यांनी पुढील 24 तासांमध्ये दिल्लीतील पाणी ओसरण्यास सुरुवात होईल. संपुर्ण परिस्थितीवर राज्यपालांसह मी लक्ष ठेवून आहे अशी माहिती अमित शाह यांनी दिली आहे. तर पुराच्या पाण्यात अडकलेल्यांच्या मदत आणि बचावकार्यासाठी योग्य प्रमाणात एनडीआरएफ पथकं तैनात करण्यात आली आहे, याबाबतची माहितीही केंद्रीय गृहमंत्रालयाने मोदींना दिली आहे.(Latest Marathi News)

दिल्लीमध्ये पूरसदृश्य परिस्थितीमुळ जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. यमुना नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने 16 जुलैपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT