देश

'राज्यांना दिलेल्या व्हेंटीलेटर्सच्या सध्यस्थितीचं ऑडीट करा'

विनायक होगाडे

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने केंद्रासोबतच राज्य सरकारांची देखील चिंता वाढवली आहे. या दरम्यानच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) देशातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात आणि लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यासाठी आज शनिवारी एक उच्चस्तरिय बैठक (Covid review meet) घेतली आहे. या बैठकी दरम्यान पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या गेलेल्या व्हेंटीलेटर्सचा वापर आणि सध्यस्थितीबाबतचे ऑडीट तुरंत केलं पाहिजे. एका अधिकृत वक्तव्यात म्हटलं गेलंय की, काही राज्यांमध्ये पुरवलेले व्हेंटीलेटर्स (ventilators provided to states) स्टोअरेजमध्येच पडून राहण्याच्या बातम्यांना गंभीरपणे घेतलं गेलं आहे तसेच असा आदेश दिला गेलाय की, केंद्र सरकार द्वारे दिले गेलेल्या व्हेंटीलेटर्सचे इन्स्टॉलेशन आणि ऑपरेटींग याचं तातडीने ऑडीट केलं जावं. (audit of installation, operation of ventilators) पुढे पंतप्रधानांनी म्हटलंय की, जर आवश्यक असेल तर आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटीलेटर्स योग्य प्रकारे वापरण्याचे प्रशिक्षण द्यायला हवं. (PM Narendra Modi Covid review meet calls for audit of installation operation of ventilators provided to states)

बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी या गोष्टींवर दिला जोर

  • स्थानिक पातळीवर कंटेनमेंट झोनबाबत रणनीती तयार करणे काळाची गरज

  • ज्या भागात पॉझिटीव्हीटी रेट खूपच जास्त आहे त्याठिकाणी टेस्टींग वाढवण्याची गरज आहे.

  • डोअर टू डोअर टेस्टींग आणि दक्षता बाळगण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य सुविधांना वाढवलं पाहिजे.

  • ग्रामीण भागात ऑक्सिजन सप्लाय योग्यपद्धतीने केला गेला पाहिजे.

विरोधी पक्षांचा आरोप आहे की देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. देशभरात ऑक्सिजन, बेड आणि आवश्यक औषधांची कमतरता आहे. या दरम्यानच काल शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी म्हटंलय की, 100 वर्षांतील सर्वांत भीषण अशी ही महासाथ प्रत्येक पावलाला जगाची परीक्षा घेत आहे. आपण अदृश्य शत्रूचा सामना करत आहोत. त्याच्याशी युद्धस्तरावर लढाई केली जात आहे. पुढे एका ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान मोदींनी म्हटलंय की, देशवासी ज्या वेदनेचा सामना करत आहेत, ती मी समजू शकतो. कोरोना ग्रामीण भारतात गतीने पसरत आहे. त्यामुळे लोकांनी मास्क परिधान करण्यासोबत आवश्यक नियम पाळणे गरजेचे आहे.

शुक्रवारी भारतात 3 लाख 26 हजार 98 नवीन रुग्ण सापडले. तर 3 लाख 53 हजार 299 जण कोरोनामुक्त झाले. तर गेल्या 24 तासात 3 हजार 890 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत भारतात एकूण 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 66 हजार 207 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. सध्या देशात 36 लाख 73 हजार 802 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT