देश

Narendra Modi Interview: IPS अधिकारी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष; नरेंद्र मोदींनी तोंडभरुन कौतुक केलेले अन्नामलाई कोण आहेत?

Tamilnadu bjp chief K Annamalai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी तमिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष अन्नामलाई यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी तमिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष अन्नामलाई यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. त्यांच्या राज्यातील चांगल्या कामाचा त्यांनी उल्लेख केला. याच पार्श्वभूमीवर अन्नामलाई कोण आहेत हे आपण जाणून घेऊया.(pm narendra modi interview with ani loksabha election bjp 2024 praises tamilnadu bjp chief K Annamalai)

अन्नामलाई हे चांगले संघटक आहेत. तरुण आहेत. प्रशासकीय सेवा सोडून ते राजकारणात आले आहे. ते डीएमकेमध्ये गेले असते तर त्यांचं लगेच नशिब बदललं असतं. पण, ते भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला आहे. आम्ही सर्वांना संधी देतो, असं मोदी म्हणाले.

कोण आहेत अन्नामलाई कुप्पुस्वामी?

अन्नामलाई कुप्पुस्वामी हे ३९ वर्षांचे असून ते तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष आहेत. भाजपला २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ३.६६ टक्के मतं मिळाली होती. पण, अन्नामलाई यांच्या नेतृत्वात भाजपने चांगलं वातावरण निर्माण केलं आहे. अन्नामलाई यांचा जन्म ४ जून १९८४ मध्ये एका शेतकरी कुटुंबात झालाय. त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण केली आहे. त्यानंतर आयआयएममधून एमबीए केलं आहे. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेचा अभ्यास केला आणि आयपीएस झाले. ते एक तडफदार पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी

२०१९ मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेतून राजीनामा दिला आणि २०२० मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ९ जुलै २०२१ मध्ये त्यांना प्रदेशाध्यक्ष पद देऊन भाजपने मोठी जबाबदारी दिली. अन्नामलाई यांनी ग्राऊंड लेव्हलला जाऊन अनेक कामं केले आहेत. त्यांची लोकप्रियता देखील वाढली आहे.

भाजपला घरोघरी पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी मागे 'एन मन, एन मक्कल' (माझी भूमी, माझे लोक) यात्रा सुरु केली होती. या यात्रेला अमित शहा यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. भाजपने त्यांच्यावर दाव लावला आहे. (PM Narendra Modi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT