PM Narendra Modi to lay wreath at National War Memorial on R-Day for the first time 
देश

अमर जवान ज्योतीला श्रद्धांजली वाहण्याची परंपरा पंतप्रधान मोडणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दरवर्षीची परंपरा मोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा प्रजासत्ताकदिनी अमर जवान ज्योती ऐवजी नव्याने निर्मित राष्ट्रीय युद्ध स्मारकात (वॉर मेमोरियल) जाऊन हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

भारत-पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धातील हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची "इंडिया गेट'वर 1972 मध्ये स्थापना करण्यात आली होती. तिन्ही सेना दलांचे प्रमुख स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी अमर जवान ज्योती येथे आदरांजली वाहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जानेवारीला सकाळी राजपथावरील संचलन सुरू होण्याआधी "वॉर मेमोरियल' येथे जाणार आहेत. तेथे ते तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांच्या आणि सरसेनाध्यक्षांच्या उपस्थितीत हुतात्मा जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहतील, अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली. या वेळी केवळ पंतप्रधान मोदीच राष्ट्रीय युद्ध स्मारकात पुष्पचक्र अर्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती 40 एकर परिसरात करण्यात आली आहे. अमर, वीरता, त्याग आणि रक्षक अशा चार चक्रांनी ते बनले आहे. यात 25 हजार 342 जवानांची नावे ग्रेनाइटवर सुवर्णाक्षरांत कोरली आहेत.

सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी

हे युद्ध स्मारक भारताने 1962मध्ये झालेले भारत-चीन युद्ध, तसेच भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या 1947, 1965, 1971 व 1999च्या युद्धांसोबतच श्रीलंकेत पाठवण्यात आलेल्या शांती सेनेतील आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेदरम्यान हुतात्मा झालेल्या सैनिकांना समर्पित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT