PM-Narendra-Modi 
देश

'जर मी ९ महिने आईच्या गर्भात राहू शकते, तर...'; पंतप्रधानांनी शेअर केलेला चिमुकलीचा फोटो पाहाच!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता पूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करत लोक घराबाहेर पडत आहेत. रविवारी कोरोनाग्रस्तांच्या संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. या लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घरीच राहावे, अशी विनंती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारही वारंवार सूचना देत आहे. मात्र, नागरिक कोरोना व्हायरसला हलक्यात घेत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

'घरी राहा, सुरक्षित राहा' असा संदेश अनेकजण सोशल मीडियातून देत आहेत. पोलिस प्रशासन तसेच सरकारी यंत्रणाही याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक हटके फोटो शेअर करत जनजागृती करण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदींनी शेअर केलेल्या फोटो हा एका लहान गोंडस मुलीचा असून तिच्या हातात एक सामाजिक संदेश लिहलेला फलक दिसून येत आहे. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (ता.२९) 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशभरातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाला अटकाव करण्यासाठी देश लॉकडाऊन करावा लागला, यासाठी त्यांनी देशातील सर्व नागरिकांची माफी मागितली. तसेच यावेळी त्यांनी कोरोनाशी मुकाबला करण्याबाबत काही गोष्टी सांगितल्या. तसेच सर्वांनी घरातच थांबावे, अशी विनंतीही त्यांनी केली. 

हा कार्यक्रम संपल्यानंतर मोदींनी एका चिमुकलीचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. 'जर मी आईच्या गर्भात नऊ महिने राहू शकते? तर तुम्ही आपल्या भारतमातेसाठी २१ दिवस घरात का नाही राहू शकत?', असे या फोटोमध्ये लिहलेल्या संदेशात म्हटले आहे. मोदींनी हा फोटो शेअर करत मनोरंजक आणि खूप खोलवर भावना सांगणारा हा फोटो असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Ganpati Panchayatan Sansthan Sangli : ‘किमान दोघांना लोळवण्याची ताकद’; अभिनेत्री भाग्यश्रीच्या पूजेवर विजयसिंह राजे संतापले

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

SCROLL FOR NEXT