The government announces the renaming of PMO to Seva Teerth and Raj Bhavan to Lok Bhavan, marking a major shift in official terminology.
esakal
PMO Renamed to Seva Teerth and Raj Bhavan Becomes Lok Bhavan : पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) नाव बदलण्यात आले आहे. ते आता ‘सेवा तीर्थ’ म्हणून ओळखले जाईल. याचबरोबर देशभरातील राजभवनांची नावे देखील बदलण्यात आली आहेत. आता त्यांना ‘लोक भवन’ म्हणून ओळखले जाईल.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, भारताच्या सार्वजनिक संस्थांमध्ये एक मोठा बदल होत आहे. प्रशासनाची कल्पना सत्तेकडून सेवेकडे आणि अधिकाराकडून जबाबदारीकडे जात आहे. हे बदल केवळ प्रशासकीय नाही तर सांस्कृतिक नैतिक देखील आहेत.
पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आता त्याच्या ७८ वर्षे जुन्या साउथ ब्लॉकमधून निघून "सेवा तीर्थ" नावाच्या नवीन प्रगत कॅम्पसमध्ये जात आहे. हा बदल सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक प्रमुख भाग आहे.
यापूर्वी, केंद्र सरकारने राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ असे ठेवले होते. पंतप्रधान कार्यालयाच्या मते, हा मार्ग आता एक संदेश देतो पॉवर हा अधिकार नाही, तर एक कर्तव्य आहे. याधी २०१६ मध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नावही बदलण्यात आले होते. पूर्वी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव रेसकोर्स रोड असे होते, परंतु २०१६ मध्ये ते लोक कल्याण मार्ग असे बदलण्यात आले.
याशिवाय, देशभरातील राजभवनांची नावे देखील बदलून लोकभवन अशी करण्यात आली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या वर्षी राज्यपालांच्या परिषदेतील चर्चेचा हवाला देत म्हटले आहे की राजभवन हे नाव वसाहतवादी मानसिकतेचे प्रतिबिंबित करते. त्यामुळे राज्यपाल आणि उपराज्यपालांची कार्यालये आता लोकभवन आणि लोकनिवास म्हणून ओळखली जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.