कवी मुनव्वर राणा कवी मुनव्वर राणा
देश

‘पाच वर्षांत वाचलो; पुन्हा योगी आले तर आम्ही वाचणार नाही’

भाजपचे नेते पश्चिम यूपीमध्ये परप्रांतीयांचा शोध घेत आहेत

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अशात कवी मुनव्वर राणा (Poet Munawwar Rana) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) सरकारवर निशाणा साधला आहे. पुढील पाच वर्षांत योगी सरकार आले तर आम्ही टिकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर ते पळून जाण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले.

पाच वर्षांत आम्ही कसेबसे वाचलो. परंतु, येत्या पाच वर्षांत पुन्हा योगी सरकार (Yogi adityanath) आले तर आम्ही वाचणार नाही. मरायचे तर आहेच पण असे नाही. भाजपचे नेते पश्चिम यूपीमध्ये परप्रांतीयांचा शोध घेत आहेत. परंतु, मी इथे पळून जाण्यासाठी बसलो आहे. मला कोणीच भेटत नाही. मी या देशातच मरीन. ते लोक वेगळे आहे जे कराचीत पळून गेले, असेही मुनव्वर राणा (Poet Munawwar Rana) म्हणाले.

यापूर्वी मुनव्वर राणा (Poet Munawwar Rana) यांनी महर्षी वाल्मिकींची तुलना तालिबानी दहशतवाद्यांशी केली होती. या वक्तव्यावर अखिल भारत हिंदू महासभेच्या प्रवक्त्याने हजरतगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ज्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. महासभेने तहरीरमध्ये राणावर कारवाईची मागणी केली होती. शिशिर चतुर्वेदी यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यावर गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT