shashi tharoor
shashi tharoor 
देश

Delhi Violence: शशी थरुर, राजदीप सरदेसाई यांच्यासह 7 पत्रकारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस खासदार शशी थरुर, न्यूज अँकर राजदीप सरदेसाई यांच्यासह सात पत्रकारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. नोएडाच्या सेक्टर 20 पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. अर्पित मिश्रा या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करण्यात आली. या लोकांनी 26 जानेवारीला दिशाभूल करणाऱ्या पोस्ट करुन दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला असं यात म्हणण्यात आलं होतं. 

पोलिसांना केलेल्या तक्रारीत अर्पित मिश्राने म्हटलंय की, तो कुटुंबीयांसोबत सेक्टर 74 सुपरटेक केपटाऊनमध्ये राहतो. त्याने आरोप केलाय की 26 जानेवारीला दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी शशी थरुर, पत्रकार राजदीप सरदेसाई, पत्रकार मृणाल पांडेय, पत्रकार जफर आगा, परेशनाथ, अनन्तनाथ, विनोद जोश यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Video: शेतकरी नेते राकेश टिकेत रडले; आत्महत्या करण्याची दिली धमकी

26 जानेवारी 2021 ला जाणूनबुजून करण्यात आलेल्या दंगलीमुळे मी अत्यंत दुखी झालो आहे. या लोकांनी आपल्या पूर्वग्रहामुळे असं काम केलं ज्यामुळे देशाची सुरक्षा आणि जनतेचे जीवन धोक्यात आलं होतं. या षडयंत्रानुसार सुनियोजित दंगा करणे आणि लोक सेवकांची हत्या करण्याच्या उद्देशाने या लोकांनी देशाची राजधानी दिल्लीमध्ये हिंसा आणि दंगे घडवून आणले, असं तक्रारदाराने एफआयरमध्ये म्हटलं आहे. 

कोरोना नाही 'प्रेमरोग' झालाय; लव्ह मॅरेजसाठी १५०० पोरींचं पलायन!

आरोपींनी जाणूनबुजून दिशाभूल करणारे आणि उकसवणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चुकीचे ट्विट केले. पोलिसांनी एका ट्रॅक्टर चालकाची हत्या केली आहे, अशा बातम्या प्रसारित केल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना गोळ्या घातल्या अशी चुकीची माहिती देण्यात आली. हे चुकीच्या उद्देशाने पसरवण्यात आले, ज्यामुळे दंगे पसरावेत आणि विविध समुदायांमध्ये तणाव निर्माण व्हावा, असं एफआयआरमध्ये म्हणण्यात आलं आहे. 

अर्पितने सर्वांवर उपद्रव पसरवण्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. आरोपींविरोधात 153a, 153b, 295a, 298,504,506, 505, 124a (sedition), 34, 120b आणि 66 आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं  एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT