police came and do last rituals of helpless woman photo viral in uttar pradesh 
देश

पोलिसांनी शेवटच्या श्वसापर्यंत काळजी घेतली पण...

वृत्तसंस्था

सहारनपूर (उत्तर प्रदेश): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर आली. पोलिस अहोरात्र रस्त्यावर उभे असून, नागरिकांची काळजी घेत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात पोलिस देवदूत बनत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिस वारंवार धावून येत असल्याचे चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे घडली आहे. बुडगाव शहरातील किशनपुरा गावात राहणाऱ्या एका विधवा महिलेला लॉकडाऊनमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. महिला आजारी पडल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिस महिलेच्या घरी आले आणि तिला मोटारीत घेऊन रुग्णालयात गेले. महिलेचे जवळचे कोणी नातेवाईक नसल्याचे समजल्यानंतर त्यांनीच काळजी घेतली. पण, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. दीपक चौधरी यांनी आपल्या पोलिस साथीदारांसह किशनपूर गावात शोक व्यक्त केला. त्यांनी या महिलेच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्ययात्रा काढली आणि सोशल डिस्टन्सिंगचं भाग राखून पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले. पोलिसांनी या महिलेच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

दरम्यान, देशात कोरोना व्हायरसची 12 हजारहून अधिक लोकांना लागण झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प आहे आणि अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर जाण्याची परवानगीही नाही. लॉकडाऊनदरम्यान पोलिस रस्त्यावर उभे राहून नागरिकांचे संरक्षण करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : प्रमाणपत्र मिळाले तरी वैधता कठीण, जीआर कोर्टात टिकणार का? संभाजी ब्रिगेडला शंका

Ichalkaranji Politics : इचलकरंजीत शिंदे गट, भाजपचे टेन्शन वाढवणार? ३५ जागांची केली चाचपणी; महायुतीसाठी वजनदार मंत्र्यांच्या घरी बैठक

Post Office Scheme : आता हॉस्पिटलच्या खर्चासाठी काढावे लागणार नाही कर्ज, टपाल विभागाची 'ही' योजना आहे खास; ५ लाखांपर्यंत होणार उपचार

Larry Ellison: हवेली-रिसॉर्ट ते स्वत:च्या नावावर एक बेट; लॅरी एलिसन यांच्या जगभरातील प्रसिद्ध प्रॉपर्टीज कोणत्या?

Latest Marathi News Updates : सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात पावसाचा कहर

SCROLL FOR NEXT