Pakistan Zindabad Slogan esakal
देश

VIDEO : काँग्रेस सत्तेत येताच 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा; तरुणावर गुन्हा दाखल

काँग्रेसचे मुस्लिम तरुण (Muslim Youth) पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सकाळ डिजिटल टीम

संबंधीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी विविध हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.

बेळगाव : मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा (Pakistan Zindabad Slogan) दिल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी (Tilakwadi Police) काँग्रेस पक्षाच्या मुस्लिम तरुणावर सुमोटो गुन्हा दाखल करून घेतला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

आरपीडी महाविद्यालयात जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातील मतमोजणी झाली. मतमोजणी सुरू असताना वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते मतदार केंद्राबाहेर थांबून घोषणाबाजी करत होते. मतदान केंद्रावर उभा केलेल्या बॅरिकेड्स जवळ थांबलेले काँग्रेसचे मुस्लिम तरुण (Muslim Youth) पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

त्यामुळं संबंधीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी विविध हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यामुळे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी यांनी सरकारतर्फे घोषणाबाजी करणाऱ्या विरोधात दिली आहे. सामाजिक शांतता बिघडवण्यासह जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG New Rule: गॅस ग्राहकांसाठी 16 ऑगस्टची डेडलाईन! eKYC न केल्यास रिफिल आणि सबसिडीवर परिणाम; घरबसल्या eKYC कशी कराल?

Doctors Protest: महाराष्ट्रात २ लाख डॉक्टरांचा बेमुदत संप; OPD सेवा ठप्प, रुग्णालयांना मोठा फटका, नेमकं कारण काय?

Jio Offer: 15 महिने इंटरनेट आणि 12+ OTT फ्री! जिओने स्वातंत्र्यदिनानिमित्त आणली भन्नाट ऑफर!

Latest Marathi News Live Update : दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व पोलिस ठाण्यांमधील महिलांसाठीच्या प्रसाधनगृहांचे आणि सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन्सचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले

IND vs AUS: भारतात पाऊल ठेवण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया घेणार मोठी रिस्क! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबाबत प्रशिक्षकांनीच दिली माहिती

SCROLL FOR NEXT