H3N2 Influenza 
देश

H3N2 Influenza : काळजी घ्या! विषाणू पसरतोय, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे निती आयोगाचे आवाहन

सकाळ डिजिटल टीम

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असं आवाहन करण्यात आले आहे. इन्फ्लूएंझाचा H3N2 विषाणू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. 

या संसर्गापासून बचाव करण्यासाठी निती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आयोगाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना मास्क घालण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात या संसर्गाची ३ हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

निती आयोगाची आज एक बैठक झाली. या बैठकित महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. शिंकताना, खोकताना तोंडावर मास्क किंवा रुमाल वापरण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. नवीन H3N2 विषाणू देशात वेगाने वाढत आहे. 

हा विषाणू कोरोनासारखा पसरू शकतो. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. व्हायरस रोखण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य विभागांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रसार केला जात आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात असे सांगण्यात आले आहे की, हा विषाणू श्वसनाच्या संसर्गामुळे होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : दिवाळीसाठी फटाके आणायला गेले, ते पुन्हा परतलेच नाहीत; ट्रकच्या धडकेत बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू...

धक्कादायक! तरुणाने ग्लासात फटाका पेटवला, तेवढ्यातच मोठा स्फोट झाला अन्...; नेमकं काय घडलं?

Air Pollution : तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदुषणामुळे! भारता रोज ५७०० लोक गमावायेत जीव, धक्कादायक अहवाल समोर...

Jalna News : अंबड-घनसावंगी तालुक्यातील 252 गावासाठी 139 पोलिस पाटील पदासाठी पात्र; 26 गावाना मिळाल्या पोलिस पाटील

दिवाळीत गोड खाण्यावर ठेवा नियंत्रण! शरिरावरील दुष्‍परिणाम टाळण्यासाठी आहारतज्‍ज्ञांचा सल्‍ला

SCROLL FOR NEXT