देश

Polling Agents: थरार पोलिंग एजंट्सच्या अपहरण अन् सुटकेचा; आमदाराने लगावली मतदाराच्या कानशिलात

Andhra Pradesh Election: पुंगानुरु विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या चित्तूर जिल्ह्यातील सदूम मंडलमधील बोकारामंडा गावातून टीडीपी एजंट्सचे अपहरण करण्यात आले होते.

आशुतोष मसगौंडे

आंध्र प्रदेशात आज लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्रित मतदान सुरू झाले. मतदान सुरू होताच तेथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चित्तूर जिल्ह्यात कथितपणे तीन टीडीपी पोलिंग एजंट्सचे अपहरण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या पोलिंग एजंट्सचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यात आली असल्याची माहीती, आंध्री प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मुकेश कुमार मीना यांनी दिली.

सीईओच्या कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकानुसार, पुंगानुरु विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या चित्तूर जिल्ह्यातील सदूम मंडलमधील बोकारामंडा गावातून टीडीपी एजंट्सचे अपहरण करण्यात आले होते.

टीडीपीचे जिल्हा प्रभारी जगन मोहन राजू यांनी तक्रार केली की, "मतदान केंद्र क्रमांक 188, 189 आणि 199 मधील टीडीपी एजंट्सचे मतदान केंद्रांवर जात असताना YSRCP नेत्यांनी त्यांचे अपहरण केले आहे."

परिणामी, CEO नी नमूद केले की, चित्तूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस विभागाने त्वरीत प्रतिसाद दिला, पिलेरू येथून अपहृत एजंटची सुटका केली आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान अपहरणकर्त्यांचा तपास सुरू आहे.

आमदाराने लगावली मतदाराच्या कानशिलात

या सर्व घडामोडी घडत असताना आंध्र प्रदेशातूनच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहगे. सत्ताधारी YRSCP नेते व्हीएस शिवकुमार यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील मतदान केंद्रावर मतदाराच्या कानशिलात लगावली आहे. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आंध्र प्रदेशात आज 25 लोकसभा आणि विधानसभेच्या 175 जागांसाठी एकाचवेळी मतदान होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Traffic Safety : नाशिकमधील अपघातांना बसणार लगाम; महापालिकेची 'ब्लाइंड स्पॉट' निर्मूलन मोहीम!

Homemade Dhoop: बाजारच्या धूपाला म्हणा रामराम! आजच घरी बनवा केमिकल-फ्री धूप; जाणून घ्या सोपी पद्धत

Gautam Adani : शरद पवार हे माझे गुरु अन् मार्गदर्शक; गौतम अदानी यांचे गौरवोद्गार

Ravindra Chavan: जागावाटपावरून महायुतीत तणाव! भाजप आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण यांचे सूचक संकेत

Latest Marathi News Live Update : एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT