Pornhub Blames Indian Govt For Drop In Traffic 
देश

मोदी सरकारच्या निर्णयाचा 'पॉर्न हब' वेबसाईटला मोठा फटका

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात पॉर्न वेबसाईट्स मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जातात. भारत ही पॉर्न वेबसाईटसाठी मोठी बाजारपेठ आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी भारत सरकारने अनेक पॉर्न वेबसाईट्सवर बंदी घातली. त्यामुळे 'पॉर्न हब' या वेबसाईटला मोदी सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. वेबसाईटने आपल्या वार्षिक अहवालामध्ये हे स्पष्ट केले आहे.

२०१८ साली मोदी सरकारने भारतात काही पॉर्न वेबसाइटवर बंदी घातल्याने भारताचे पॉर्न बघणाऱ्या यादीतील स्थान घसरले आहे, असं पॉर्न हबने आपल्या अहवालात म्हटलं आहे. नुकत्याच जारी केलेल्या पॉर्न हबच्या यादीमध्ये भारत पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीत १५ व्या स्थानी आहे. पॉर्न पाहणाऱ्या अव्वल २० देशांमधूनच पॉर्न हबवर ७९ टक्के ट्रॅफिक मिळते असंही या अहवालात म्हटलं आहे.

मोदी सरकारने २०१८ च्या सुरुवातीला भारतामध्ये ८२७ पॉर्न वेबसाईटवर बंदी घातली होती. यामुळे वेबसाईटवर येणाऱ्या भारतीयांचे प्रमाण कमी झाल्याचे पॉर्न हबने म्हटले आहे. २०१८ साली पॉर्न हबवर सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर असणारा भारताची या यादीमध्ये १५ व्या स्थानी घसरण झाली आहे. पॉर्न हबने नुकताच आपला सातवा वार्षिक अहवाल जाहीर केला. या अहवालामध्ये पॉर्न हबने भारतासंबंधातील आकडेवारी जारी केली आहे.

सुलेमानींच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, तब्बल 35 जणांचा मृत्यू; तर...

तत्पूर्वी, २०१७ साली केंद्र सरकारने इंटरनेट सेवा पुरवाणाऱ्या कंपन्यांनी ८२७ वेगवेगळ्या पॉर्न वेबसाईट देशात दाखवल्या जाऊ नयेत असा आदेश दिला होता. देहरादूनमध्ये बारावीच्या चार मुलांनी दहावीच्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये आरोपी मुलांनी पॉर्न वेबसाईटवर व्हिडिओ पाहून गुन्हा केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारने देशामध्ये पॉर्न वेबसाईटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या कारवाईनंतर देशातील दोन सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपन्यांनी म्हणजेच रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने आपल्या नेटवर्कवरील पॉर्न वेबसाईटवर बंदी घातली होती. प्रत्यक्षपणे वेबसाईट पाहण्यावर सरकारने बंदी घालत्यामुळे पॉर्न हबला मोठा फटका बसला. त्याचा परिणाम त्यांच्या वेबसाईटवर येणाऱ्या युझर्सच्या संख्येवर आणि अप्रत्यक्षरित्या कमाईवर झाल्याचे त्यांनी अहवालात स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

SCROLL FOR NEXT