देश

Parosmia : कोरोनामुक्त झाल्यानंतर होणारा हा आजार लहान मुलांसाठी धोकादायक

कोरोनामुक्त होणाऱ्या अनेकांमध्ये या आजाराची लक्षणं दिसून येत आहेत.

सुधीर काकडे

जगभरात कोरोनाचा (Covid19) प्रसार झाल्यानंतर रोजच आरोग्याशी (Health) संबंधीत वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या त्रासासोबतच आता कोरोनामुक्त झाल्यानंतर अर्थातच पोस्ट कोविड आजारांबद्दल (Post Covid Symptoms) अनेक चिंताजनक बाबी समोर येत आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर लहान मुलांमध्येही वेगवेळी लक्षणं दिसून आली आहेत. त्यानुसार काही मुलं चव आणि वास घेण्याच्या क्षमतांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आहाराशी संबंधीत अडचणी निर्माण होऊ शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया (UEA) मधील तज्ञांनी केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. 'पॅरोसमिया' (Parosmia) या नावाने ओळखला जाणारा हा विकार कोरोनामुक्त झालेल्या प्रौढांमध्ये आढळून येत असल्याचं दिसत होतं. मात्र आता हा विकार लहान मुलांनामध्येही दिसून येतोय. या आजाराची लक्षणं ओळखण्यासाठी, UEA आणि चॅरिटी फिफ्थ सेन्सने एक मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, या विकारामुळे मुलांना ते खात असलेल्या अन्नातून कुजलेल्या मांसासारखा किंवा रसायनांसारखा घाणेरडा वास येऊ शकतो. हाच प्रकार अन्नाच्या चवीबद्दल सुद्धा होऊ शकतो. UEA ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीमध्ये प्रोफेसर कार्ल फिलपॉट यांनी म्हटलंय की, पॅरोसमियामुळे कमी कोणत्याही पदार्थाचा योग्य तो वास येत नाही. वासाच्या मिश्रणातील काही घटकांचाच वास घेण्याची क्षमता शिल्लक राहते आणि अन्नाचा वेगळाच वास येतो. त्यामुळे मुलांच्या आहारावर याचा गंभीर परिणाम होण्याच्या शक्यता आहेत.

दरम्यान, अमेरीकेतील अंदाजे 250,000 प्रौढ लोकांना कोरोनामुक्त झाल्यानंतर पॅरोसमिया झाला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत, विशेषत: गेल्या सप्टेंबरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्गा झाल्यानंतर हे लक्षात आलं की, त्याचा परिणाम मुलांवरही होत आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.

कोरोनाबाधित झालेल्या लोकांमध्ये पॅरोसमिया हे एक मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचंही अनेक बालरोग तज्ञांनी सांगितलं आहे. कोविडमुळे पॅरोसमिया होऊ शकतो. कारण यामुळे नाकात जळजळ होते आणि वास बदलतो. त्यामळे वासाच्या संवेदनांशी संबंधित नसांचं नुकसान होतं. कोरोनामुक्त झालेल्या काही लोकांमध्ये ही लक्षणं दिसू शकतात. मात्र ती सौम्य असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

SCROLL FOR NEXT