Prashant Kishor

 

esakal

देश

Prashant Kishor Bihar Election 2025 : प्रशांत किशोर निवडणूक लढवणार नाही? ; जन सूराज पार्टीची पहिली उमेदवार यादी जाहीर

Jan Suraaj Party Candidate List 2025 : बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग; प्रशांत किशोर यांचा पक्ष सर्व २४३ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती

Mayur Ratnaparkhe

Prashant Kishor’s Stand on Contesting Elections : बिहार विधानसभा निवडणुकीच्या ताराखांची घोषणा झालेली आहे. त्यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यंदा दोन टप्प्यात निवडणूक होणार असून, त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे.  

आता प्रशांत किशोर यांच्या जन सूराज पार्टीने ५१ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. तर प्राप्त माहितीनुसार त्यांच पक्ष बिहारमधील सर्व २४३ जागांवर उमेदवार देणार आहे. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर हे स्वत: ही निवडणूक लढवणार नसून ते केवळ रणनीतीकार आणि निर्णय घेण्याची भूमिका निभवणार आहेत.

यंदा बिहारमधील निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. कारण, सत्ताधारी एनडीए आघाडी आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी व्यतिरिक्त यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जन सूराज पार्टीनेही उडी घेतलेली आहे.

शिवाय, आम आदम पार्टी आणि बहुजन समाज पार्टी सारखे पक्षही ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहेत. तर दुसरीकडे एनडीए आघाडीत जागा वाटपावरून अद्यापही रुसवे, फुगवे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्यतिरिक्त इंडिया आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून अद्यापही एकमत होताना दिसत नाही.

त्यातच आता प्रशांत किशोर यांच्या जन सूराज पार्टीने ५१ जणांचा पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत प्रशांत किशोर यांचे नाव नसल्याने, ते निवडणूक लढवणार की नाही याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. तरी आगामी उमेदवार याद्यात त्यांचे नाव दिसते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

याआधी निवडणूक आयोगाकडून बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी एक मोठा दावा केला होता. जन सूराज पार्टी एनडीए आणि महाआघाडी दोघांचीही मोठ्याप्रमाणात मतं कमी करेल आणि मागील निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदान न करणारे २८ टक्के लोक यावेळी त्यांच्या जन सूराज पार्टीला मतदान करतील. असं त्यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गॅरेजमध्ये काम करणारे धर्मेंद्र कसे झाले सुपरस्टार? दोन वेळच्या जेवणासाठी करावं लागत होतं ओव्हरटाईम

Satara Accident: 'टेंपोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू'; लोणंद- नीरा रस्त्यावर अपघात, एक जण गंभीर जखमी..

बॉलिवूडचा ही -मॅन हरपला! अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चाहत्यांना धक्का

Phaltan Crime: 'फलटणमध्ये दुचाकी चोरट्यास अटक'; शहर पोलिसांची कारवाई, सीसीटीव्ही फुटेजद्वारे गुन्ह्याचा छडा

Dhairyasheel Mohite Patil: विकासाचे व्हिजन ठेवून उमेदवार निवडणूक रिंगणात: धैर्यशील मोहिते पाटील; अकलूजमध्ये फोडला प्रचाराचा नारळ..

SCROLL FOR NEXT