Prashant Kishor
Prashant Kishor  Team eSakal
देश

आमच्या पक्षात कधीपर्यंत थांबणार? काँग्रेस नेत्याच्या प्रश्नाला प्रशांत किशोरांचं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेसमध्ये प्रवेश करतात की नाही हे सोनिया गांधींसोबतच्या तिसऱ्या भेटीनंतर ठरण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर हे सोनिया गांधींसोबत (Sonia Gandhi) बैठक घेणार आहेत. त्यांनी काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्यासाठी रणनिती देखील आखली आहे. पक्षातील एका नेत्यानं विचारले, की तुम्ही पक्षात कधीपर्यंत राहणार? याला प्रशांत किशोर यांनी उत्तर दिले आहे.

गेल्या आठवड्यात प्रशांत किशोर यांनी गांधी कुटुंबीयांची भेट घेतली आणि पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी सादरीकरण केले. यावेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री गेहलोत आणि भूपेश बघेल यांना देखील हे सादरीकरण दाखवण्यात आलं होतं. प्रशांत किशोर यांची सोनिया गांधी आणि पॅनेलच्या सदस्यांमध्ये झालेल्या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी किशोर यांना काही प्रश्न विचारले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर पक्षात किती काळ थांबतील? असा प्रश्न गेहलोत यांनी विचारला. त्यानंतर ''तुम्ही माझे किती ऐकता, यावर ते अवलंबून आहे', असं प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार की नाही? याबाबत सोनिया गांधी निर्णय घेणार आहेत. यासाठी पक्षातील इतर नेत्यांचा सल्ला घेत असल्याची माहिती मिळतेय. सोनिया गांधी प्रशांत किशोर यांच्या भूमिकेबाबत प्रियांकांसह राहुल यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर प्रशांत किशोर यांचा पक्षाबाबतचा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरविण्यात येणार आहे.

प्रशांत किशोर यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम केले आहे. गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये त्यांची रणनीती यशस्वी झाल्यानंतर गांधी कुटुंब आणि प्रशांत किशोर यांच्यात चर्चा सुरू झाली. आता काँग्रेसला आगामी निवडणुका कशा जिंकता येतील, यासाठी किशोर रणनिती आखली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT