Mahant Narendra Giri Team eSakal
देश

श्वास कोंडून झाला महंत नरेंद्र गिरींचा मृत्यू - शवविच्छेदन अहवाल

थोड्याच वेळात नरेंद्र गिरींच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू गळ्याला फास घेतल्यानं श्वास कोंडून झाला असल्याचं शवविच्छेदनानंतर स्पष्ट झालं आहे. पाच डॉक्टरांच्या टीमनं हे शवविच्छेदन केलं. त्यानंतर नरेंद्र गिरी यांचं पार्थीव मठामध्ये नेण्यात आलं. तत्पूर्वी बाघंबरी मठातून निघालेल्या त्यांच्या अत्यंयात्रेत अनेक साधू आणि लोक सहभागी झाले होते. दरम्यान देशातील विविध महामंडलेश्वर आणि १३ आखाड्यांचे साधू प्रयागराज येथे पोहोचले आहेत. इथे काही वेळातच नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवावर दफनविधीद्वारे अत्यंसंस्कार केले जाणार आहेत.

नरेंद्र गिरी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले होते की, जर महंत नरेंद्र गिरी यांची हत्या झाली असेल तर मारेकरी वाचणार नाही. तसेच जर त्यांना आत्महत्येसाठी कोणी कारणीभूत ठरलं असेल तर तो देखील सुटणार नाही. त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना त्यांनी इतर कोणत्याही प्रश्नांवर उत्तर देण्यास नकार दिला तसेच या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं सांगितलं.

दरम्यान, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू हा कट-कारस्थानाचा भाग आहे, असा आरोप हरिद्वारमधील साधुंनी केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी ब्लॅकमेलिंगमुळे आयुष्य संपवण्याच्या निर्णयाप्रत पोहोचल्याचे म्हटले आहे. एका मुलीसोबतच्या मॉर्फ फोटोवरुन शिष्य आनंद गिरी ब्लॅकमेल करत होता, असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

या चिठ्ठीत भागमबरी मठाचे पुजारी आध्य तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप यांचे सुद्धा नाव आहे. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यात आनंद गिरीवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT