Draupadi Murmu P Chidambaram Narendra Modi esakal
देश

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या गावात वीजच नाही; चिदंबरम यांचा केंद्रावर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

एनडीएच्या वतीनं राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय.

नवी दिल्ली : एनडीएच्या (NDA) वतीनं राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (Presidential candidate) म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपतीपदासाठी होताच त्यांच्या गावाची चर्चा देशभर सुरू झालीय. मात्र, याचदरम्यान द्रौपदी मुर्मू यांच्या गावाचं व्यथित करणारं भीषण वास्तव्य देखील समोर आलंय. या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते पी. चिदंबरम (Congress leader P. Chidambaram) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधलाय.

मुर्मू यांचा ज्या गावात जन्म झाला, त्या डूंगरीशाही गावात देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली. मात्र, अद्यापही वीज (Electricity) पोहोचू शकलेली नाहीय. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील ऊपरबेडा गावात झाला. या गावाची लोकसंख्या अवघी 3500 इतकी आहे. या गावात दोन वाड्या आहेत. एक बडाशाही आणि दुसरी डुंगरीशाही यापैकी बडाशाहीमध्ये तर वीजेची व्यवस्था आहे. मात्र, अद्यापही डुंगरीशाहीमध्ये वीज पोहोचू शकलेली नाहीय. वीज नसल्यानं येथील नागरिक रात्रीच्या उजेडासाठी रॉकेलच्या दिव्याचा उपयोग करतात. तर, मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करावी लागते.

चिदंबरम यांनी ट्विट करून लिहिलंय की, याआधी पंतप्रधान मोदींनी दावा केला होता की, सर्व गावात वीज पोहोचलीय. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या मूळ गावातच वीज पोहोचू शकली नाहीय. तिथं वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार युद्धपातळीवर पावलं उचलत असल्याचं आपण बातम्यांमध्ये पोहतोय. वीज नसलेलं हे एकमेव गाव नाहीय. भारतातील अनेक दुर्गम भागात आणि गावांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे. गेल्या 75 वर्षात आम्ही जे काही साध्य केलं, ते खरोखरच प्रभावी आहे. परंतु, भारताच्या सर्व भागांमध्ये अत्यावश्यक सेवा पोहोचणं हे नेहमीच प्रगतीचं कामं राहिलंय. तर, दुसरीकडं पंतप्रधानांनी 2004 पर्यंतच्या अतुलनीय कामगिरीची कबुली द्यायला हवी होती आणि त्यांचं सरकार केवळ मागील सरकारांचं काम सुरू ठेवत आहे, असा घणाघातही त्यांनी मोदी सरकारवर केलाय.

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील ऊपरबेडा गावात झाला. या गावाची लोकसंख्या अवघी 3500 इतकी आहे. या गावात दोन वाड्या आहेत. एक बडाशाही आणि दुसरी डुंगरीशाही यापैकी बडाशाहीमध्ये तर वीजेची व्यवस्था आहे. मात्र, मुर्मू ह्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार घोषित होताच प्रशासन कामाला लागलंय. ओडीशा सरकारनं तातडीनं याची दखल घेत गावात विजेची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केलीय. राज्य सरकारकडून आता या गावात विजेचे पोल आणि डीपी उभारण्याचं काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

माजी सरन्यायाधीश राज्यसभेतून निवृत्त, ६ वर्षात एकही प्रश्न विचारला नाही, चर्चेत एकदाच सहभाग त्यातही वादग्रस्त विधान

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar News: बारवेलगत अतिक्रमणाचा डाव उधळला; महापालिकेची कारवाई; समर्थनगरमध्ये पत्र्याचे शेड हटविले

Sambhajinagar Hospital News: घाटीवरील ताण कमी होणार; १८९ कोटींचे माता-बाल रुग्णालय लवकरच सुरू; दूध डेअरी परिसरात अत्याधुनिक महिला रुग्णालय

SCROLL FOR NEXT