Students Clean Toilet Viral Video
Students Clean Toilet Viral Video esakal
देश

Viral Video : निरागस विद्यार्थ्यांवर शाळेतील 'Toilet' स्वच्छ करण्याची सक्ती; धक्कादायक व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ धक्कादायक असतात तर काही व्हिडिओ कॉमेडी असतात. मात्र अलीकडे व्हायरल होत असलेला शाळेतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्याचा हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये शाळेतील लहान मुले चक्क टॉयलेट स्वच्छ करताना दिसताय. हे बघून अनेकजण थक्क झाले असून या व्हिडिओची सर्वत्र चर्चा चालली आहे.

माहितीनुसार हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बालिया जिल्ह्यातील सोहवनमधील आहे. पिपरा कला प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देण्याऐवजी त्यांच्याकडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली जात होती. या निरागस विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह स्वच्छ करण्याची चक्क सक्ती केली गेल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टच दिसून येते. एका व्यक्तीने तर त्या विद्यार्थ्यांना खडसावत शौचालयाची नीट साफसफाई केली नाही तर ते बंद करू, असेही म्हटले आहे.

कोणीतरी गुपचूप हे प्रकरण कॅमेऱ्यात कैद केले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. या सगळ्यांमागे शाळेच्या मुख्याध्यापकाचा हात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून शाळेच्या निरागस मुलांवरील अशी सक्ती बघून नेटकरी पेटून उठले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

Video: PM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार गट आक्रमक

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT