the prisoner cut off his genitals and offered them in the temple 
देश

कैद्याने पाहिले स्वप्न अन् केले नको ते कृत्य...

वृत्तसंस्था

ग्वालहेर (मध्य प्रदेश): एका कैद्याने झोपेत असताना स्वप्न पाहिले आणि उठल्यावर कारागृहाच्या आवारात असलेल्या मंदिरात गेला आमि गुप्तांग कापून अर्पन केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ग्वालहेर केंद्रीय कारागृहाचे अधीक्षक मनोज साहू यांनी सांगितले की, एक 25 वर्षीय कैदी हत्येच्या आरोपाखाली 2018 पासून शिक्षा भोगत आहे. कैद्याने मंगळवारी (ता. 5) सकाळी 6.30 वाजता कारागृह परिसरातील शंकराच्या मंदिरात पूजा केली आणि तेथे चमच्याच्या सहाय्याने गुप्तांग कापून अर्पण केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होऊ लागल्यामुळे जोरजोरात ओरडू लागला. त्याचा रडण्याचा आवाज ऐकून वॉर्डन घटनास्थळी पळत आले. त्यावेळी कैदी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.

शुद्धीत आल्यावर कैद्याने सांगितले की, 'सोमवारी (ता. 4) रात्री भगवान शंकर माझ्या स्वप्नात आले होते. त्यांना मी स्वप्नात पाहिले. भगवान शंकरानीच मला असे करायला सांगितले. त्यानुसार मी केले आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

SCROLL FOR NEXT