Pritilata Waddedar Esakal
देश

Narishakti: स्वातंत्र्यलढ्याचा अभिमान ठरलेल्या शूरवीर प्रीतिलता वड्डेदार कोण होत्या?

"ज्योत जगाई आजादीकी वो झॉसीवाली राणी थी, वतन के खातिर कुर्बानी देनेवाली प्रीतिलता वड्डेदार नारी जातिका खरीका गौरव थी"

Shailaja Nitave

शैलजा अजित निटवे-

स्वातंत्र्या रे तुझ्याचसाठी, दिले तयानी प्राण।

चरणांचा आज तयांच्या, असे आम्हां अभिमान ।

इतिहासाने असामान्य शौर्य व बुद्धिमत्ता असणाऱ्या अनेक स्त्रिया पाहिल्या. ज्यांनी आपल्या देशासाठी शौर्याने लढा देऊन देशाला त्यांच्या पराक्रमातून भव्य दिव्य असे योगदान दिले अशा शूर व पराक्रमी महिलांचे आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्मरण करुया.

"ज्योत जगाई आजादीकी वो झॉसीवाली राणी थी, वतन के खातिर कुर्बानी देनेवाली प्रीतिलता वड्डेदार नारी जातिका खरीका गौरव थी"

पश्चिम बंगालमधील चटगाव जे आताच्या बांगला देशात आहे तेथील एका गरीब कुटुंबात 5 मे 1911 रोजी प्रीतिलता यांचा जन्म झाला. त्यांचे वडील नगरपालिकेत कारकून होते. प्रीतिलता या शालेय जीवनातच बालचर संस्थेची सदस्य झाल्या होत्या. तेथेच त्यांनी सेवा व शिस्तीचे धडे गिरविले. बालचर संस्थेत सदस्यांना ब्रिटीश सम्राटाशी निष्ठेची शपथ घ्यावी लागली. तेव्हा संस्थेचा हा नियम कुमारी प्रीतिलता यांना अस्वस्थ करत असे. क्रांतीचे हे बीज त्यांच्या मनात येथेच रूजले होते.पुढे त्या ढाका विद्यापीठातून त्यांनी बी. ए. ची पदवी घेतली. पदवी नंतर ती चिटगाव (चटगाव) येथे येऊन कुटुंबाला मदत करण्यासाठी एका शाळेत नोकरी करू लागली. त्याच्या दृष्टीने तिचे कुटुंब म्हणजे संपूर्ण देश होता.

राणी लक्ष्मीबाईच्या चरित्राने प्रभावित असलेल्या प्रीती प्रीतिलतांची सूर्यसेन उर्फ मास्टरदा यांच्याशी ओळख झाली. आणि नंतर त्यांचे जीवनच बदलून गेले. अलिपूर जेलमध्ये बंद असलेल्या क्रांतिकारी रामकृष्ण विश्वास यांना बेमालूमपणे भेटणारी प्रीतिलता मास्टरदा यांच्यासाठी बुलेट ठरली. 'इंडियन रिपब्लिक आर्मी' मध्ये त्यांनी मानाचे स्थान पटकावले, वेष पालटणे, शत्रूला चकवणे यात त्या तरबेज झाल्या. मास्टरदा सूर्यसेन व सहकाऱ्यांनी चितगाव मधील लष्करी शस्त्रसाठा लुटला.

तेव्हा प्रीतिलता यांची महत्वाची भूमिका केली होती. पण इंग्रजांच्या असफल प्रयत्नानंतर ते पळून जाण्यात यशस्वी झाले. इंग्रजांच्या निशाण्यावर प्रीतिलता अपूर्वसेन व निर्मलसेन होते. यात दुर्दैवाने ते दोघे शहिद झाले. याचा प्रीतिलतांवर प्रचंड आघात झाला. जीवाभावाचे सहकारी गेल्यामुळे त्या काही काळ सैरभैर झाल्या. पण त्यांनी या दुःखातून स्वतःला सावरले.

आपल्यालाही देशासाठी असाच जीव द्यावा लागणार या आनंदात त्या कार्यशील राहिल्या. पुढे त्यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांना मारणाऱ्या कॅप्टन कॅमरॉन' यांना मारण्याचे धाडस त्यांनी केले. योग्य ती मदत करून मास्टरदांच्या हस्ते कॅमरॉनला मारले पण एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही.स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात त्यांना वेगळे काहीतरी करून दाखवायचे होते. त्यावेळी इंग्रजांचा मनोरंजनासाठी एक क्लब होता. इंग्रज अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये जा असायची. त्या क्लबवर एक भली मोठी पाटी होती. त्यावर लिहिले होते की Indians and Dogs are not allowed ती पाटी पाहून प्रीतिलता खूप संतापल्या आणि त्यांनी मनात ठरविले की भारतीयांना प्रवेश नाकारणाऱ्या या क्लबलाच उडवून टाकायचे.

मास्टरदां यानी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. कारण हे काम करण्यात खूप जोखीम होती. पण प्रीतिलतांनी त्यांचे ऐकले नाही. त्या म्हणाल्या, काय होईल? माझा जीवच जाईल ना ? पण माझ्या देशवासियांना कुत्रा म्हणून हिणविणाऱ्या इंग्रजाना त्यांची योग्यता दाखवावीच लागेल?

ठरल्याप्रमाणे पुढे 24 सप्टेंबर 1932 ला त्यांनी शिख-पुरुषाचा वेष परिधान केला. सोबत सात सहकाऱ्यांना घेतले. बॉम्ब, बंदुका, दारुगोळा व सायनाईड विषाची कॅप्सूल ही सोबत घेतली. आणि खिडकीतून आत बॉम्ब टाकून स्फोट घडवून आणला. इंग्रज अधिकारी चक्रावून गेले. त्यांनीही गोळीबार सुरू केला. प्रीतिलता वड्डेदार यांनी 10 ते15 अधिकाऱ्यांना यमसदनास पाठविले. मोठे युद्ध सुरू होते. त्यात प्रीतिलतांच्या सह‌काऱ्यांकडील दारूगोळा संपत आला होता. त्याचवेळी इंग्रजांच्या एका गोळीने प्रीतिलतांचा वेध घेतला. रक्ताळलेल्या जखमी अवस्थेत प्रीतिलता यांनी आपल्या सहकाऱ्यांना पळून जाण्यास मदत केली आणि त्या खाली कोसळल्या.

पुढे काही वेळानंतर त्या जेव्हा शुद्धीवर आल्या तेंव्हा बंदूक रोखून समोर उभ्या असलेल्या इंग्रज शिपायांना त्यांनी पाहिले. मोठ्या चातुर्याने लपविलेली सायनाईड कॅप्सूल त्यांनी गिळून टाकली आणि देशासाठी जीव उधळून टाकला. 21 वर्षे वयाच्या प्रीतिलतांचे बलिदान व त्या रणचंडिकेचा आवेश पाहून इंग्रजी चकित झाले.

कोसळतानाही त्यांच्या तोंडातून एकच जयघोष बाहेर पडत होता तो म्हणजे 'वंदे मातरम्' । त्या क्षणी सारे क्रांतिकारक हळहळले. इंग्रजानीही त्या कोवळ्या तरुणीच्या धाडसापुढे मस्तक झुकविले. प्रीतिलता यांचे बलिदान वाया गेले नाही. त्यानंतर काही वर्षातच भारत स्वतंत्र झाला. धन्य ती भारत माता आणि धन्य त्या वीरांगणा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT