Priyanka Gandhi Sakal
देश

Priyanka Gandhi: प्रियांका गांधी लोकसभा लढवणार? पक्षाच्या सरचिटणीसपदी कायम पण जबाबदारी नाही

प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इतर राज्यांच्या प्रचारात भाग घेण्यास सुरूवात केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या संघटनात्मक बदलाला मूर्तस्वरुप दिले असले तरी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पक्षाकडून काय जबाबदारी दिली जाईल, यावर अद्याप पक्षाने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. यासंदर्भात येत्या काही दिवसांत पक्षाची भूमिका स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इतर राज्यांच्या प्रचारात भाग घेण्यास सुरूवात केली. गेल्या काही महिन्यांपासून हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि नुकत्याच संपलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीमध्ये काँग्रेसच्या स्टार प्रचारक म्हणून त्याच सहभागी झाल्या होत्या. (Latest Marathi News)

प्रचार प्रमुख-

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केलेल्या संघटनात्मक बदलांमध्ये प्रियांका गांधी यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी कायम ठेवले आहे. परंतु त्यांना अद्यापही जबाबदारी दिलेली नाही. आतापर्यंत उत्तर प्रदेशची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रियांका गांधी यांच्याऐवजी आता उत्तर प्रदेशामध्ये पक्ष वाढविण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील नेते अविनाश पांडे यांच्यावर सोपविली आहे. प्रियांका गांधी यांना पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत काही नेत्यांनी दिले आहेत. काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रियांका गांधी यांना मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

रायबरेली किंवा अमेठी-  

याशिवाय प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. सोनिया गांधी आरोग्याच्या समस्यांमुळे रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक नाहीत. रायबरेली किंवा अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून प्रियांका गांधी यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT