Karnataka Election esakal
देश

Karnataka Election : 'शिव्यांचं काय घेऊन बसलात, देशासाठी गोळ्या झेललेले पंतप्रधान मी बघितलेत'

संतोष कानडे

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकमध्ये भाजप आणि काँग्रेस समोरासमोर भिडले आहेत. विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय रणधुमाळीला वेग आलेला आहे.

कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील एका सभेत बोलतांना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या पंतप्रधानांच्या दिलेल्या ९१ शिव्या कमीत कमी एका पानावर तरी मावत आहेत. परंतु त्यांनी दिलेल्या शिव्यांचं पुस्तक काढावं लागले, कारण त्यांची यादी मोठी आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी कर्नाटक येथील एका सभेत मोदांनी विषारी साप, असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी खुलासा करुन सारवासारव केली होती. त्यावर बोलतांना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने आतापर्यंत आपल्याला ९१ वेळा वेगवेगळ्या पद्धतीने शिव्या दिल्याचं नमूद केलं होतं.

यावर बोलतांना प्रियंका कांधी म्हणाल्या की, मागच्या दोन-तीन दिवसांपासून मी बघतेय हे काहीतरी विचित्र आहे. मी अनेक पंतप्रधानांना बघितलं आहे. इंदिरा गांधी यांनी या देशासाठी गोळ्या खाल्ल्या आहेत. मी राजीव गांधींना बघितलं आहे. देशासाठी त्यांनी आपला जीव दिला.

परंतु नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत, जे आपल्यासमोर येतात आणि मला शिव्या दिल्या म्हणून रडतात. तुमचं दुःख ऐकण्याऐवजी ते स्वतःच्या समस्या सांगत आहेत. गांधी पुढे म्हणाल्या, मोदीजी तुम्ही हिंमत करा. माझा भाऊ राहुल गांधीकडून शिका. तो म्हणतोय की देशासाठी गोळ्या खायला तयार आहे, फक्त शिवी नाही. असं सांगत त्यांनी मोदींसाह भाजपवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yajna Ritual: खळबळजनक ! देवाचं बोलावणं आलं, २० भाविक देहत्याग करणार; पुण्यातील भाविकांचाही समावेश, नेमकं काय घडलं?

GST Reform: GSTतील बदलामुळे सरकारला बसणार 40,000 कोटींचा फटका; नवे दर दिवाळी नाही तर 'या' दिवशी लागू होणार

Pune Ganesh Festival : गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; पुण्यातील मंडळांचे आकर्षक देखावे सज्ज

आदिनाथ कोठारेचा नवा अवतार! पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार, प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

RBI: रिझर्व्ह बँकेचा खातेदारांना दिलासा!

SCROLL FOR NEXT