PSI Recruitment Scam Case
PSI Recruitment Scam Case esakal
देश

PSI भरती संदर्भात मोठी बातमी! 52 परीक्षार्थी कायमस्वरूपी डिबार; पोलिस महासंचालकांचा आदेश

सकाळ डिजिटल टीम

पोलिस उपनिरीक्षक (नागरी) पदासाठी ५४५ पुरुष आणि महिला जागांसाठी भरतीचे आयोजन केले होते.

बंगळूर : पोलिस उपनिरीक्षकांच्या (नागरी) ५४५ जागांसाठी लेखी परीक्षा (PSI Recruitment Scam) घेण्यात आली होती. या वेळी परीक्षार्थीकडून बेकायदा कृती करण्यात आल्याने पोलिस खात्याकडून सर्व ५२ परीक्षार्थींवर कायमस्वरूपी डिबार करण्यात आले आहे.

त्यांना यापुढे कोणत्याही प्रकारच्या पोलिस खात्यातील परीक्षेत (Police Recruitment Exam) सहभागी होता येणार नाही, असा आदेश पोलिस महासंचालक (भरती) कमल पंत आणि आर्थिक गुन्हे शाखा बंगळूर यांनी हा आदेश जारी केला आहे.

२१ जानेवारी २०१९ ला पोलिस उपनिरीक्षक (नागरी) पदासाठी ५४५ पुरुष आणि महिला जागांसाठी भरतीचे आयोजन केले होते. ३ ऑक्टोबरला सकाळी अकरापासून दुपारी साडेबारापर्यंत दोन टप्प्यात राज्यातील सात केंद्रामध्ये लेखी परीक्षेचे आयोजन केले होते.

बंगळूर शहर, म्हैसूर शहर, मंगळूर शहर, हुबळी-धारवाड, गुलबर्गा शहर, तुमकूर जिल्हा आणि दावणगिरी जिल्ह्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. सीआयडीने हाती घेतलेल्या तपासात परीक्षार्थीनी लेखी परीक्षावेळी ब्लूटूथ आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा उपयोग केल्याचे उघडकीस आले होते.

त्याचबरोबर इतर परीक्षार्थींनी गैरमार्गातून ओएमआरसीट मिळविली होती. त्यामुळे लेखी परीक्षा बेकायदा ठरविली गेली होती. त्यामुळे याप्रकरणी बंगळूर शहर, गुलबर्गा शहर, हुबळी-धारवाड शहर, आणि तुमकुर शहरासह विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते. सीआयडीने तपास करून दोषारोप दाखल केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA vs PAK : युएसएने इतिहास रचला! मुंबईकर नेत्रावळकरची सुपर ओव्हरमध्ये सुपर बॉलिंग, पाकिस्तानचा पराभव

Ajit Pawar on Baramati Result: "बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य"; अजित पवारांची जाहीर कबुली

USA vs PAK : युएसएने पाकिस्तानचा निम्मा संघ शंभरच्या आत गुंडाळला; आफ्रिदीनं पार करून दिला 150 धावांचा टप्पा

Shooting World Cup : सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध; जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी

मोहोळच्या ज्येष्ठ नागरिकाला सोलापूरच्या रिक्षावाल्याने लुटले! कोंडीच्या पेट्रोल पंपावर नेऊन ‘फोन-पे’वरून काढले १.५ लाख रूपये

SCROLL FOR NEXT