Pulwama Attack
Pulwama Attack 
देश

Pulwama: पुलवामा हल्ल्याची १० दिवसांनंतर होणार होती पुनरावृत्ती; सैन्य अधिकाऱ्याच्या पुस्तकातून मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात ४० जवान शहीद झाले होते. पण असाच भीषण हल्ला पुन्हा १० दिवसांनी घडवून आणण्याचं नियोजन दहशतवाद्यांकडून करण्यात आलं होतं, असा धक्कादायक खुलासा एका माजी सैन्य अधिकाऱ्यानं आपल्या पुस्तकातून केला आहे. (Pulwama like attack was to be repeated after 10 days big revelation from an retired army officer book)

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामामध्ये हा हल्ला झाला होता. चिनार कॉर्प्सचे कमांडर राहिलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल केजीएस ढिल्लंन यांनी आपल्या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 'कितने गाजी आए, कितने गाजी गए' या पुस्तकात त्यांनी हा खुलासा केला आहे.

ढिल्लन यांनी पुस्तकात म्हटलं की, पुलवामाच्या हल्ल्यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला करुन पुलवामा सारखा हल्ला पुन्हा घडवण्याचा कट रचला होता. पण गुप्तचर यंत्रणांच्या सूचनांनुसार कारवाई करताना सुरक्षा रक्षकांनी या दहशतवाद्यांचा हा टक उधळून लावत आधीच त्यांचा खात्मा केला.

या हल्ल्याची सूचना कुलगाममधील डीएसपी अमन कुमार ठाकूर यांनी राष्ट्रीय रायफल्सला याची गुप्त माहिती दिली. या सुचनेनंतर त्याच दिवशी कुलगाममध्ये तुरीगाम इथं या दहशतवाद्यांना घेरलं जर दहशतवादी तिथेच असल्याची पुष्टी झाली त्यानंतर दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरु झाला. या गोळीबारात जवान बलदेव राम शहीद झाले. तसेच एका जखमी जवानाला वाचवताना डीएसपी अमन ठाकूर हे देखील शहीद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT