arrest 
देश

पुण्याच्या तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; बिहार पोलिसांवर कारवाईचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

पाटणा - पुण्यातील एका अल्पसंख्यांक युवकाला अवैध पद्धतीने ताब्यात घेतल्याची गंभीर दखल बिहारच्या मानवाधिकार आयोगाने घेतली. आयोगाने युवकाला पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. त्याचप्रमाणे, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षकांसह सर्व दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचा आदेशही आयोगाने दिला. आयोगाचे सदस्य उज्ज्वल कुमार दुबे यांनी प्रकरणाची सुनावणी करत हा निर्णय दिला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जरार असे या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची आई डॉ. नुसरत एजाज शेखर यांनी ६ नोव्हेंबर २०१९ रोजी फिर्याद दाखल केली होती. बिहारमधील पश्चिम चंपारण्यमधील साठी ठाण्याशी संबंधित ही घटना आहे. या ठाण्यात ऑक्टोबर २०१८ मध्ये बलात्कार, अशांतता पसरवणे आदी गुन्ह्यांशी संबंधित कलमाअंतर्गत जरारविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सायकल सोसायटीमधील तो रहिवासी आहे. जरारची गुन्ह्यात प्राथमिक नाव असल्यावरून अटक करून चौकशीशिवायच थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. हे प्रकरणच खोटे असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले होते. त्यानुसार न्यायालयात एक एप्रिल २०१९ ला अंतिम अहवालही सादर करण्यात आला. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे त्याला २६ मार्च २०१९ ते १७ जुलै २०१९ या काळात तुरुंगात खितपत पडावे लागले.

आयोगाच्या आदेशात काय म्हटले?
पोलिसांनी एका युवकाला फसवून १६ जून २०१९ ते १७ जुलै २०१९ दरम्यान अवैध पद्धतीने तुरुंगात ठेवले. पोलिसांची ही कृती सभ्य समाज व कल्याणकारी राज्याच्या दृष्टीने पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे.

खोट्या गुन्ह्यात अडकवल्या प्रकरणी तीन पोलिसांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी निसार अहमद, पोलिस निरीक्षक विनोद कुमार सिंह आणि  पोलिस शिपाई कृष्ण कुमार यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20त शतक! नाबाद १११ धावांनी रचला इतिहास; अनेक विक्रम मोडले, फलंदाजने मैदान गाजवले

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT