Punjab CM Charanjit Singh Channi Google
देश

पंजाबच्या निवडणुका पुढे ढकलल्या... निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

ओमकार वाबळे

निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 14 फेब्रुवारीला पार पडणाऱ्या या निवडणुका आता 20 तारखेला होतील. तर 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. (punjab assembly election dates postponed)

पंजाबमध्ये (Punjab) १४ फेब्रुवारीला होणारी निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे (Election Comission) धाव घेतली होती. १४ फेब्रुवारीला होणारं मतदान पुढे ढकलण्याची मागणी भाजप (BJP), काँग्रेससह (Congress) अनेक पक्षांनी केली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, भाजप आणि बसपा यांनी निवडणूक आय़ोगाला या संदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे.

काय आहे कारण?

निवडणूक पुढे ढकलण्याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, १६ फेब्रुवारीला संत रविदास जयंती आहे. पंजाबमध्ये लाखो भाविक त्यांची पूजा करण्यासाठी वाराणसीला जातील. अशा स्थितीत ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीची तारीख बदलण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी पत्राद्वारे केली होती.

याशिवाय भाजप आणि अमरिंदर सिंग यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयोगाची बैठक पाडली. अखेर 14 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुका 20 फेब्रुवारीला पार पडणार आहेत. आणि मतमोजणी ठरल्याप्रमाणे 10 मार्चला होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT