Bhagwant Mann and Arvind Kejriwal 
देश

Bhagwant Mann : पंजाब सरकारची पहिली विकेट पडली; कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा, कारण...

सकाळ डिजिटल टीम

चंदीगढ - पंजाबचे कॅबिनेट मंत्री फौजा सिंह सरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी फौजा सिंग यांच्यावर भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप होता. तसेच त्यांची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. ज्यामध्ये ते आपल्या ओएसडीसोबत भ्रष्टाचारातून कमाई करण्याबद्दल बोलत होते. (Bhagwant Mann news in Marathi)

पंजाबचे कॅबिनेट मंत्री फौजा सिंह यांनी वैयक्तिक कारणं देत राजीनामा दिला. मी पक्षाचा निष्ठावान सैनिक असून कायम एक सैनिक म्हणून राहिलं, असंही ते म्हणाले. फौजा सिंग सरी यांचा हा ऑडिओ सप्टेंबरमध्ये व्हायरल झाला होता, त्यानंतर आम आदमी पार्टीने त्यांना दोन कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या.

या राजीनाम्यानंतर पंजाबच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक मंत्र्यांची खातीही बदलली जाऊ शकतात. त्याचबरोबर नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, असे सांगितले जात आहे. आज संध्याकाळी राज्यपालांच्या निवासस्थानी साध्या समारंभात नव्या चेहऱ्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

Manoj Jarange: प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील, मुख्यमंत्री किती द्वेष करतात; मनोज जरांगेंचा टोला

काय सांगता! 'सेल्फी मैंने ले ली आज' फेम ढिंच्याक पूजा अडकली लग्नबंधनात; नेटकरी म्हणाले- कुणाचे इतके वाईट दिवस आले की...

IPL 2027 मध्ये राहुल द्रविड CSK चा मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंगची हकालपट्टी? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स...

Sangli Accident News : सांगलीचे नायब तहसीलदार दादासो पुकळेंची डॉक्टर मुलगीचे अपघाती निधन; कोकण पयर्टन बेतलं जिवावर

SCROLL FOR NEXT