Rahul Gandhi 
देश

राहुल गांधींचा गुन्हेगारी इतिहास अन् दृष्टीकोन...; पूर्णश मोदींचं SCमध्ये प्रतिज्ञापत्र

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - मोदी आडनाव प्रकरणातील तक्रारदार पूर्णेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात २१ पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांनी राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास विरोध केला आहे.

पूर्णेश ईश्वरभाई मोदी यांनी म्हटले, की आरोपींप्रती उदारता दाखवू नये कारण त्यांचा पंतप्रधानांबद्दलचा तीव्र द्वेष दिसून येतो. आपल्या वक्तव्यात त्यांनी मोदी आडनाव असलेल्या संपूर्ण जनतेला चोर म्हटले आहे.

राहुल गांधींच्या भाषणाची व्हिडीओग्राफी करण्यात आली आणि सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आल्याचे पूर्णेश मोदी यांनी शपथपत्रात म्हटले आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने बदलण्याची गरज नाही.

उच्च न्यायालयाचा निर्णयही न्यायाच्या ठोस तत्त्वांवर आधारित आहे. राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देणारा सत्र न्यायालयाचा आदेशही कायद्यानुसार असल्याचंही पूर्णेश मोदींनी म्हटलं.

या प्रकरणी राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. इतकंच नाही तर राहुल गांधींचा ‘गुन्हेगारी इतिहास’ आहे, त्यांच्याविरोधात अनेक खटले प्रलंबित आहेत. राहुल यांनी मोठ्या वर्गाविरुद्ध दुर्दैवी आणि निष्काळजीपणे अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचंही प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT