Raksha bandhan sakal
देश

Raksha Bandhan 2023: स्वातंत्र्यलढ्यात राखी बनली होती प्रमुख हत्यार, गुरुदेव टागोरांचे आहे मोठे योगदान

रक्षाबंधनाचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही खुप मोठे योगदान आहे.

सकाळ डिजिटल टीम

Raksha Bandhan Festival : रक्षाबंधन हा ब भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे.पण रक्षाबंधनाचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही खुप मोठे योगदान आहे. कारण रक्षाबंधनने भारताची एकात्मता टिकवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ही घटना आहे १६ ऑक्टोबर १९९५ ची. रक्षाबंधन होऊन एक महिना अधिक झाला होता. रविंद्रनाथ टागोर यांनी पहाटे गंगेत स्नान करून आपल्या दिवसाची सुरुवात केली होती आणि लोकांना मिरवणुकीसाठी बोलावले होते. वाटेत सापडलेल्यांना राखी बांधणे हा मिरवणुकीचा उद्देश होता. त्याच्यासोबत राख्यांचे बंडल होते. परंतू या मिरवणूकीचा भाऊ बहिणीशी काही एक संबंध नव्हता. हे रवींद्रनाथ टागौर यांनी हिन्दू-मुस्लिम एकता म्हणून आवाहन करत होते. त्यांनी हिंदू मुस्लिम लोकांना आवाहन केले होते की इंग्रजांच्या बोलण्यात येऊ नका. एकमेकांना राखी बांधा आणि शपथ घ्या की तुम्ही कधीही वेगळे होणार नाही आणि एकमेकांसाठी समोर येणार.

सणांचे महत्त्व तारखेनुसार नसते त्यासाठी भावना महत्त्वाच्या असतात. त्यामुळेच 16 अक्टूबर 1905 ला टागोर यांनी रक्षाबंधन साजरी केली.

भारताच्या ईशान्येकडील भागात सध्याचे आसाम, ओडिशा, बांगलादेश आणि बिहार यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापण करणे इंग्रजांना कठीण वाटत होते. त्यामुळे या भागांची दोन स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी करावी, असा त्यांचा विचार होता. ब्रिटीश हिंदू मुस्लिम नुसार विभागणी करत होते कारण बंगालचा पूर्व भाग मुस्लिम बहुसंख्य होता आणि पश्चिम भागात हिंदू समाजाचे वर्चस्व होते.

या फाळणीच्या विरोधात देशभरात आंदोलने झाली. पण ती फाळणी थांबवण्यासाठी टागोरांनी रक्षाबंधनला नवे महत्त्व दिले.रक्षाबंधन हा बहिण भावाचा फक्त सण नाही तर प्रत्येक नागरिकांचा एकमेकांप्रती रक्षा करण्याचा सण आहे.या दिवशी तुम्ही एकमेकांची रक्षा करण्याची शपथ घेऊ शकता, मग ती रक्षा हिंदू मुस्लिम धर्माच्या एकतेची रक्षा का नसो, अशा आशयातून रविंद्रनाथ टागोर यांनी हे आंदोलन केले होते, ज्याची इतिहासात नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

Latest Marathi Breaking News : बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळच्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे भावुक; महामार्ग सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

OpenAI Startup : फॅक्टरीत बनणार हवं तसं बाळ! आयुष्यभर कसलाच आजार नसेल; पाण्यासारखा पैसा ओततायत लोक; काय आहे Gene-Edited Baby

Kolhapur Leopard: झुडपातून बाहेर आला बिबट्या! समोरच्या थराराने पशुपालकाचे हृदयच थरारले; म्हैस-बकऱ्या टाकून गावाकडे धूम

SCROLL FOR NEXT